या 5 युक्ती देतील पायाच्या भेगांपासून मुक्ती
थंडीत पायाच्या टाचांना भेगा पडणे अगदी सामान्य आहे. परंतू भेगा वाढणे, सूज येणे, वेदना होणे, यामुळे चालताना त्रास जाणवतो. यापासून वाचण्यासाठी हे 5 उपाय अमलात आणा:
1. पेट्रोलियम जेलीचा वापर सर्वात सोपा उपाय आहे. यासाठी दीड चमचा व्हॅसलीनमध्ये एक लहान चमचा बोरिक पावडर मिसळून घ्या. रात्री झोपताना ही पेस्ट टाचांवर लावून घ्या. काही दिवसात आराम पडेल.
2. आमचुराचे तेल भेगांसाठी रामबाण औषध आहे. हे घट्ट असतं जे विरघळवून आपण रात्री टाचांवर लावू शकता. सकाळी पाण्याने धुऊन टाका. काही दिवसातच टाचा नरम पडतील.
3. टाचांमध्ये अधिक भेगा पडल्या असतील तर मॅथिलेटिड स्पिरिटमध्ये कापसाचा गोळा भिजवून भेगांवर लावा. असे दिवसातून तीन ते चार वेळा करा. परंतू टाचांना धूळ-मातीपासून वाचवायचे आहे हेही लक्षात असू द्या.
4. कोमट पाण्यात जरा शांपू, एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाकून मिसळून घ्या. या पाण्यात 10 मिनिटापर्यंत पाय टाकून बसावे. त्वचा फुगल्यावर मॅथिलेटिड स्पिरिट लावून टाचांना प्यूमिक स्टोन किंवा इतर पाय घासण्याच्या ब्रशने रगडून स्वच्छ करून घ्या. याने टाचांची डेड स्कीन स्वच्छ होऊन जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट जैतून किंवा नारळाच्या तेलाने मालीश करा.
5. पायांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी पेडिक्योर करावे. हे पायाचे नख, टाच, आणि तळपाय स्वच्छ करण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. नियमित हे केल्याने समस्या सुटेल. पेडिक्योर आपण घरी करू शकता किंवा ब्युटी स्पेशालिस्टकडून करवणेही उत्तम ठरेल.