मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

भांग पिण्याचे 5 फायदे, जाणून घ्या...

भांग पिणे आरोग्यासाठी धोकादायक असले तरी आनंद मिळवण्यासाठी ही उपयोगी वस्तू आहे. परंतू याचे काही औषधी गुणदेखील आहे जे जाणून आपल्यालाही आश्चर्य वाटेल-
* एकीकडे भांगचे अधिक सेवन केल्याने डोकेदुखी उद्भवतं तसेच डोकेदुखीचा उपचारही याने संभव आहे. होय, भांगेच्या झाडाच्या पानांचा अर्क काढून, त्याचे काही थेंब कानात टाकल्याने डोकेदुखीपासून सुटकारा मिळेल.
 
* पचनशक्ती वाढवण्यासाठी भांग फायदेशीर आहे. कोणत्याही प्रकाराची जखम झाल्यावर या झाडाच्या पानांचा लेप बनवून जखमेवर लावावा. अशाने जखम लवकर भरेल.

* आपली त्वचा अधिक रुक्ष असल्यास भांगेच्या पानांनी त्वचा नरम होऊ शकते. पानांचा लेप तयार करून त्वचेवर लावावा.
 
* कमी मात्रेत भांगेचे सेवन आपल्या भावनांची तीव्रता वाढवतं. हे स्पष्ट ऐकण्यात आणि दिसण्यात मदत करतं. याचे सेवन केल्याने आपला मूडदेखील चांगला होऊन जातो.
 
* भांगेच्या बियांमध्ये प्रोटीन आणि अमीनो अॅसिड आढळतं, जे कॅलरी बर्न करण्यार्‍या स्नायूंच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. व्यायाम केल्यानंतर भांगच्या बियांचा ज्यूस किंवा शेक पिणे फायदेशीर ठरेल.