शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

गर्भावस्थेत येऊ शकते पाळी

साधारणता गर्भावस्थेत मासिक पाळी येत नाही. पाळी न येणे हे गर्भधारणेचे सूचक आहे. परंतू गर्भवती महिलेला ब्लीडिंग सुरू झाली तर सर्वात पहिली भीती मिसकॅरेजची असते परंतू काही महिलांनी गर्भावस्थेत पाळी येते आणि याने बाळाला धोका नसतो.
 
तज्ज्ञांप्रमाणे गर्भाशय दोन भागात असणार्‍यांसोबत हे घडू शकतं. याला बायकोर्नुएट यूट्रस असे म्हणतात. ज्यात एका भागात बाळ वाढतं आणि दुसर्‍या भागात पीरियड्स येतात.
 
गर्भावस्थेत ब्लीडिंग होण्याचे कारण
 
इम्प्लांटेशन ब्लीडिंग किंवा स्ट्रीकिंग : फर्टिलाइज अंडज गर्भाशयात आल्यावर हलका रक्तस्त्राव होऊ शकतो. या दरम्यान एक किंवा दोन दिवस केवळ स्पॉटिंग होते.
 
ट्यूबल प्रेग्नेंसी : अंडज यूट्रसऐवजी फॅलोपियन ट्यूबमध्ये वाढत असल्यास त्याला ट्यूबल प्रेग्नेंसी म्हणतात आणि यात ब्लीडिंग होते.
 
अधिक रक्तस्त्राव : चौथ्या, आठव्या किंवा बाराव्या आठवड्यात मासिकचक्राच्या दरम्यानच घडतं. लक्षण मासिक पाळीसारखीच असतात जसे शारीरिक वेदना, गॅस, मूड स्वींग होणे.
 
संबंधानंतर रक्तस्त्राव : गर्भावस्थेत शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होऊ शकतो. हे धोकादायक नाही तरी डॉक्टरांना याबद्दल माहिती द्यावी.
 
मिसकॅरेज : गर्भाला वाढवण्यात शरीर अक्षम असल्यास ब्लीडिंग होते. परंतू गर्भधारणेचे सोळा आठवडे झाले की हा धोका नसतो.
 
तर, गर्भावस्थेत ब्लीडिंग होत असेल किंवा स्पॉटिंग होत असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.