शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (11:40 IST)

गर्भवती महिलांमध्ये कोरोनाव्हायरस लसीची भीती!

आतापर्यंत कोरोना काळात लसीकरण केवळ व्यसक आणि वृद्धांसाठी उपलब्ध होते. नुकतीच केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी लसीकरण देखील सुरू केले आहे. तथापि, याबद्दल गर्भवती महिलांच्या मनात खूप भीती आहे. कुठेतरी त्यांचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम किंवा मुलावर त्याचा परिणाम होऊ नये. परंतु गर्भवती महिलांना ही लस घेण्यास तज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. तथापि, ही लस केव्हा आणि कशी घ्यावी हे डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केले पाहिजे.
 
गर्भवती महिलांनी कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सोनोग्राफीसाठी केंद्रावर जेव्हा पोहचावे जेव्हाची वेळ निश्चित केली गेली असेल.
डबल मास्क वापरा.
आपण बाहेर असतांना हात सॅनिटाय करणे सुरु ठेवा पण घरी साबण वापरा.
वॅक्सीनेशननंतर हलका ताप येऊ शकतो अशात क्रोसिन घेता येऊ शकते.
वैक्सीनेशननंतर डिलेव्हरी झाल्याने मुलामध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
आहाराकडे पूर्णपणे लक्ष द्या. ताण घेऊ नका आणि मन शांत असू द्या.
प्रसुतिनंतर कोणत्याही वेळी ही लस दिली जाऊ शकते.
बाळांना स्तनपानही दिले जाऊ शकते. त्याच्यात भीती नाही.
मुलाला जन्म देणार्‍या 10 महिलांवर संशोधन करण्यात आले. या संशोधनात असेही समोर आले आहे की लसीचा एक छोटा कणही दुधात सापडला नाही.
ब्रेस्‍ट फीडिंग दरम्यान मुलांशी अंतर राखावं. कारण आपल्या तोंडकिंवा नाकातील पार्टिकल्स द्वारे मुलांमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो. फीडिंग नंतर देखील बाळशी अंतर ठेवावं.
फीडिंग करवताना डबल मास्‍क लावावा.
गर्भवती महिलांसाठी वॅक्सीनेशन हेच सुरक्षा कवच आहे.
गर्भवती महिलांना कोवॅक्‍सीन घेण्याचा सल्ला दिला जात आहे ज्याने दोन्ही डोज लवकर दिले जाऊ शकतात.