शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (09:09 IST)

या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो

कोरोना विषाणूची दुसरी लाट एक धोकादायक रूप घेत आहे. दररोज देशभरातून प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोविड 19 विषयी प्रत्येकाच्या मनात भीती असते, परंतु कठीण काळात या भीतीवर मात करून, आपल्याला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती कायम राहील आणि संक्रमणाचा धोका कमी होईल. आपल्या बऱ्याच लहान सवयीमुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. अशा काही सामान्य सवयी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत-
  
बाहेरून आल्यावर हात न धुणे   
आपण देखील बाजारात गेले असल्यास, नंतर परत आल्यावर हात धुवा. हात न धुता लोक कोरोनाचा धोका वाढवतात. बाजारात, एखाद्याने वस्तूंना स्पर्श केल्याचा किंवा लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे.
  
पॅकेटला तोंडाने उघडणे 
सहसा काही लोकांना हाताने पॅकेट न उघडण्याची सवय असते, ते तोंडाने हे पॅकेट उघडतात. त्याने कोरोना संसर्ग देखील होऊ शकतो कारण आपल्याला माहीत नाही की कोण  कोणत्या व्यक्तीच्या हाताखालून पॅकेट गेले आहे.
 
वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे 
डोळ्यांना सारखे सारखे हात लावणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. त्याच वेळी, वारंवार कामाच्या मध्यभागी डोळ्यांना स्पर्श केल्यास देखील संसर्ग होण्याचा धोका असतो. ही सवय सोडणे चांगले आहे.
  
दिवसभर अंथरुणावर राहणे किंवा अॅक्टिव्हिटी न करणे  
अंथरुणावर बसून सतत काम करणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया न करणे. आपल्या  रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करत जाते, याचा  केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही बलकी कोरोनाचा धोकाही वाढतो.
 
स्ट्रीट फूड किंवा बाहेरच्या खाद्य पदार्थांना लगेचच खाणे  
आपण भाज्या किंवा फळे खरेदी करता. आपण आणत्या बरोबर किंवा बाहेरील गोष्टी खाऊ नये. तुम्हाला घरी आल्यानंतर वस्तूंना धुवायचे तसेच आपले हात देखील धुवावेत, जेणेकरून जोखीम वाढणार नाही.