शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:27 IST)

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र

राज्यात अत्त्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याचे पडसाद आता चित्रपटसृष्टीवरही पडू लागले आहेत. लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे अनेक मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले आहेत. सध्या आयपीएल चे सामने सुरू असल्यामुळे प्रेक्षकवर्ग तिकडे आकर्षित होऊ नये तसेच आर्थिक नुकसानीला पुन्हा तोंड द्यावे लागू नये यासाठी अनेक मालिकांनी आपले चित्रीकरण परराज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच आता ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने’ चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी पत्र लिहलं आहे.
 
पत्रामध्ये पुढे लिहले आहे की कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी तुम्ही ब्रेक द चेन मोहीम अंतर्गत लॉक डाऊन घोषित केला आणि त्यांनातर आपण सर्वच प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक दिला. हिंदी चॅनल ने आपले शूटिंग महराष्ट्राबाहेर हालवले आहे.मनोरंजन इंडस्ट्री आपल्याकडे यावी म्हणून अनेक राज्यांनी रेड कारपेट अंथरली आहेत. आज लॉक डाऊनचा आधार घेऊन महाराष्ट्राबाहेर शूटिंग व्यवस्थित आणि योग्य बजेट मध्ये पार पडली जाऊ लगली तर ही इंडस्ट्री महाराष्ट्राबाहेर जायला वेळ लागणार नाही. बॉलिवूड इंडस्ट्री ही महराष्ट्राची शान आहे. या इंडस्ट्री वर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील लाखो कलाकार,तंत्र,कामगारबेकार होतील काही हजार कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असणार्‍या इंडस्ट्री मधून मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो. योग्य खबरदारी घेऊन चित्रीकरण पार पाडू अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.