Sharadiya Navratri Vrat साबुदाणा थालीपीठ पाककृती
साहित्य-
साबुदाणा-एक वाटी
राजगिऱ्याचे पीठ- अर्धा वाटी
बटाटा-एक मध्यम आकाराचा
दही- दोन चमचे
हिरवी मिरची पेस्ट
जिरे
कोथिंबीर
सेंधव मीठ चवीनुसार
तेल किंवा तूप
पाणी
कृती-
सर्वात आधी साबुदाणा पाच तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर निथळून घ्या. नंतर हलक्या हाताने कुस्करून त्यातला ओलसरपणा कमी करा. भिजवलेला साबुदाणा मऊ झाला पाहिजे, पण जास्त पाणी राहू नये. आता एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, राजगिऱ्याचे पीठ किंवा शेंगदाण्याचे कूट, दही, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि सेंधव मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र मळून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून मऊ पीठ तयार करा. पीठ जास्त ओले किंवा चिकट होऊ नये. आता एका प्लास्टिक शीटवर तेल लावा. पीठाचा मध्यम आकाराचा गोळा घ्या आणि हलक्या हाताने थापून गोल थालीपीठ बनवा. मध्यभागी बोटाने छोटे छिद्र करा. आता तवा गरम करा आणि त्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. तयार थालीपीठ हलक्या हाताने तव्यावर ठेवा. छिद्रात आणि कडेला थोडे तेल घाला. आता मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग भाजून घ्या. आता गरम थालीपीठ उपवासाच्या दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik