शारदीय नवरात्रीत बनवा उपवासाची चविष्ट पाककृती शेंगदाण्याची बर्फी
साहित्य-
एक कप- शेंगदाणे
काजू
बदाम
१/४ कप- नारळाचे तुकडे
तीन चमचे- मावा
१/२ कप गूळ
एक चमचा- तूप
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे, काजू, बदाम आणि नारळाचे तुकडे भाजून घ्या. आता शेंगदाण्याचे कवच काढून टाका आणि सर्व भाजलेले साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता तूप गरम करा, मावा घाला आणि परतून घ्या. माव्यात गूळ घाला आणि वितळेपर्यंत शिजवा. व शेंगदाण्याचे मिश्रण घाला आणि तूप वेगळे होईपर्यंत अर्धा मिनिटे शिजवा. आता एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण प्लेटवर पसरवा. थंड झाल्यावर, इच्छित आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली शेंगदाणा बर्फी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik