रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (18:32 IST)

उन्हाळयात हे 5 पेय प्या, अशक्तपणा जाणवणार नाही

कोरोना विषाणूच्या काळात उष्णतेचा उद्रेक सुरु आहे. उन्हाळ्यात थकवा आणि डोकेदुखी,आळशीपणा जाणवणे ही सर्व सामान्य बाब आहे. या सर्व गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो.परंतु काही पेय असे आहे जे आपण उन्हाळ्यात कधीही पिऊ शकता. या मुळे आपण ताजे तवाने अनुभवाल.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 ताक- उष्णता आणि कोरोना विषाणूच्या बाबतीत हे खूप निरोगी आणि फायदेशीर आहे. जेवल्यानंतर देखील आपण हे घेऊ शकता .यामुळे उन्हाळ्यात पाचक प्रणाली चांगली होते आणि चवीत देखील हे खूप चविष्ट आहे. तरी ताक आणि दह्याचे सेवन संध्याकाळी 5 नंतर करू नये. 
 
2 कैरी पन्हे - उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्यायल्याने उष्माघात होत नाही. चवीला आंबट असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे एक चांगले पेय आहे.रात्री आंबट फळांचे सेवन करू नये. जेवल्यानंतर हे प्यायल्याने पाचन क्रिया चांगली राहते आणि शरीरात उर्जावान अनुभवाल.
 
3 थंडाई -बाजारात याचे पॅकेट सहजपणे उपलब्ध होते आणि आपण हे घरी देखील बनवू शकता. घरी बनविण्यासाठी खसचे दाणे 3-4 तास भिजत ठेवायचे आहे. नंतर हे मिक्सर मध्ये वाटून घ्या. त्यात काळीमिरी घाला.नंतर ही तयार पेस्ट दुधात मिसळा. थंडाई पिण्यासाठी तयार आहे. हे प्यायल्याने भूक कमी लागते आणि शरीराला थंडावा मिळतो. 
 
4  आवळा शरबत - उन्हाळ्यात आवळा शरबत प्यायल्याने ताजेपणा जाणवतो.हे व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करतो.आवळ्याचं शरबत डोळे आणि केसांसाठी फायदेशीर आहे. 
 
5 बेलाच शरबत- उन्हाळ्यात थंडावा आणि तंदुरुस्थी टिकविण्यासाठी बेलाच शरबत फायदेशीर आणि प्रभावी आहे. या मध्ये व्हिटॅमिन सी ,पोटॅशियम,केल्शियम सह इतर पोषक घटक आढळतात. हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो.