मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 20 जुलै 2022 (12:28 IST)

Brain Food मेंदू तल्लख ठेवण्यासाठी हे 6 पदार्थ खा

काय आपण कधी विचार केला आहे की मेंदू तल्लख ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे. खरं तर असे काही पदार्थ आहेत ज्याने मेंदू निरोगी राहण्यास मदत मिळते. हेल्दी ब्रेनसाठी या वस्तूंचे सेवन करावे.
 
हिरव्या पालेभाज्या- पालक, ब्रोकली भरपूर प्रमाणात याचे सेवन करा. यात व्हिटॅमिन के, ल्यूटिन, फॉलेट, बीटा कॅराटिन इतर सामील असतं जे मेंदूसाठी योग्य आहे.
 
भोपळाच्या बिया - भोपळाच्या बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी योग्य ठरतं याने मेंदू निरोगी राहतं कारण यात झिंक आढळतं. झिंकने मेमेरी पॉवर वाढते. सोबतच थिंकिंग स्किल्स सुरळीत होते. मुलांना भोपाळाच्या बिया खायला द्यावा ज्याने त्यांची स्मरण शक्ती वाढते आणि योग्यरीत्या विकसित होते.
 
अक्रोड - अक्रोड मेंदूसाठी हेल्दी असतं. याने मेंदूच्या कार्य करण्याची क्षमता वाढते. मेंदू सक्रिय राहतं. यात व्हिटॅमिन ई, कॉपर, मँगनीज आढळतता ज्याने ब्रेन पावर वाढते.
 
डार्क चॉकलेट - डार्क चॉकलेटमध्ये कोको आढळतं. कोकोमध्ये एका प्रकाराचे अॅटीऑक्सीडेंट असतं ज्याला फ्लेवोनॉयड्स म्हणतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ताण घेण्याचा थेट परिणाम मेंदू वर होतो आणि स्मरण शक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूसंबंधित आजाराला सामोरा जाण्यासाठी अक्रोड मदत करतं.
 
बेरी - बेरीमध्ये अँटीऑक्सीडेंट फ्लेवोनॉएड्स आढळतात जे ब्रेन सेल्सला जबूत करतात. मेंदूची शक्ती वाढवतात. आपल्या मुलांना स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, रॅस्पबेरी इतर खायला देऊ शकता.
 
सोया प्रॉडक्ट - पॉलीफेनोल्सच्या कमतरतेमुळे स्मरण शक्तीवर प्रभाव पडतो. सोया प्रॉडक्ट्समध्ये आइसोफ्लेवोन्स नावाचे पॉलीफेनोल्स असतात. हे केमिकल अँटीऑक्सिडेंटच्या रुपात कार्य करतात आणि मेंदूसकट पूर्ण शरीरात आरोग्य लाभ देण्यास मदत करतात.