मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (15:26 IST)

Blood Sugar Control करण्यासाठी वेलचीचे पाणी प्या, जाणून घ्या कसे तयार करावे

Diabetes असल्यास शरीराचे ब्लड शुगर लेवल नॉर्मल असणे आवश्यक आहे. शुगर लेवल वाढल्याने अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी औषधांचे सेवन, तणावापासून मुक्त राहणे आणि आहारावर नियंत्रर ठेवणे आवश्यक असतं. तसेच हिरवी वेलची यात असणारे पोषक घटक ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यास मदत करतात.
 
वेलचीमध्ये आढळणारे पोषक घटक
हिरवी वेलची ही जीवनसत्त्वे, खनिजे, मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, नियासिन, पोटॅशियम यासारख्या अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे देखील प्रभावी ठरू शकतात. हिरव्या वेलचीच्या पाण्याचे सेवन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया हिरव्या वेलचीच्या पाण्याचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत.
 
हिरव्या वेलचीचे फायदे
केवळ मधुमेहच नाही तर वेलचीचे सेवन रक्तदाबावरही फायदेशीर ठरू शकते. खरं तर, वेलचीमध्ये आढळणारे कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. त्याच बरोबर याचा वापर मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे आणि त्याचे रुग्ण हे सेवन करू शकतात. याशिवाय ते पचन सुधारू शकतात, अतिसार, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या समस्यांपासून आराम देतात. यासोबतच दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यापासून बचाव होतो.
 
हिरव्या वेलचीचे पाणी कसे बनवायचे
हिरवी वेलची पाणी बनवणे खूप सोपे आहे, यासाठी तुम्ही एका बाटलीत अर्धा लिटर पाणी घ्या आणि या पाण्यात 3 - 4 वेलची टाका आणि रात्रभर पाणी झाकून ठेवा. हे पाणी सकाळी एक तृतियांश राहेपर्यंत उकळा, त्यानंतर ते चहाप्रमाणे दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.
 
डिस्क्लेमर : हा लेख केवळ सामान्य माहिती प्रदान करतं. अधिक तपशिलांसाठी नेहमी एखाद्या तज्ञाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेबदुनिया या माहितीची जबाबदारी घेत नाही.