ज्वारीचे आरोग्यलाभ
ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय घटक असतात. पचनतंत्राची कार्यक्षमता चांगली ठेवण्यास त्यामुळे मदत होते. त्याशिवाय ज्वारीमध्ये मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असल्याने शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आवश्यक असते.
त्याशिवाय वजन कमी करण्यासाठीही ज्वारी फायदेशीर आहे. शिवाय रक्तप्रवाह सुरळीत राहातो.
मधुमेही व्यक्तींना देखील ज्वारी फायदेशीर ठरते. ज्वारीमध्ये टेनिन नावाचा घटक असतो. त्यामुळे एन्झाइम्सच्या उत्पादनावर नियंत्रण राहाते. त्यामुळे शरीरातील स्टार्च शोषण्याचे काम होते.
शरीरात इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळीही संतुलित राहाण्यास मदत होते. ज्वारीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यासही मदत होते. ज्वारी हृदयाचे आजार आणि संधिवाताच्या आजारातही फायदेशीर असते