रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (16:19 IST)

समस्या टॉन्सिलायटिसची

टॉन्सिलायटिस हा घशाशी निगडित संसर्गजन्य आजार आहे. जो नवजात बालकांमध्ये सर्वाधिक दिसतो. टॉन्सिलायटिस झाल्यास घशाच्या अंतर्गत भागात सूज येणे आणि वेदना होतात. त्यामुळे गिळणे त्रासदायक होते. अनेकदा हा आजार इतका गंभीर असतो की बोलताना, आवंढागिळतानाही खूप वेदना
होतात. घशाच्या अंतर्गत भागात टॉन्सिल्स असतात आणि ते घशाचे संरक्षक असतात. कारण तोंडावाटे घशात जाणारे जिवाणू आणि विषाणू यांच्यापासून टॉन्सिल्स रक्षण करतात. त्यालाच सर्वसामान्यपणे टॉन्सिल्स सुजले असे म्हटले जाते. या समस्या लहान मुलांना लवकर भेडसावतात. शरीर याची काही लक्षणे जाणवून देते ती कोणती आहेत, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया.
 
टॉन्सिल्सची कारणे : टॉन्सिलायटिस होण्याची अनेक कारणे असतात. टॉन्सिलायटिसची समस्या होण्याचे कारण म्हणजे टॉन्सिल्स अश्रत असणे. त्याशिवाय प्रतिकारशक्ती कमी झाल्यास, खूप गरम किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले, अतिथंड पदार्थ खाणे आणि तोंडाची स्वच्छता न राखल्यास टॉन्सिलायटिस होतो. अनेकदा पोट खराब असेल, बद्धकोष्ठता झाली असेल किंवा प्रदूषण, धूळ आदी कारणांमुळेही टॉन्सिलायटिस होतो.
 
टॉन्सिल्सवर उपचार : टॉन्सिल्सवर घरगुती उपाय करायचे असतील तर घसा ओलसर राहण्यासाठी आणि शरीरातील पाणी निघून जाऊ नये यासाठी दोन तासाने मिठाच्या कोमट पाण्याने गुळणा कराव्यात. टॉन्सिल्समुळे जिवाणू संसर्ग झाला असेल तर प्रतिजैविके घ्यावी लागतात. अनेकदा टॉन्सिल्स,
क्रोनिक टॉन्सिल्स आणि जिवाणूजन्य टॉन्सिलायटिस यावर उपचारांसाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.
 
गुंतागुंत कोणती? : टॉन्सिल्स सुजतात. श्वास घेणे अवघड जाते आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्नियामुळे गुंतागुंत निर्माण होते. कधी-कधी संसर्ग घशाच्या इतर पेशींपर्यंत पोहोचू शकतो. टॉन्सिल्समध्ये पू होतो त्यामुळे टॉन्सिलर अ‍ॅब्सेस होतो. रुमेटीक फीवर, पोस्ट स्ट्रेप्टोकॉकल, ग्लोमेरूलोनेफ्रयटिस या गुंतागुतींच्या गोष्टी टॉन्सिल्समुळे होतात. 
 
घरगुती उपाय : हर्बल चहा प्यायल्यास टॉन्सिल्सची समस्या लवकर सुटते. टॉन्सिल्समुळे टॉन्सिलायटिसचा संसर्ग होतो आणि हर्बल चहामुळे यावर असलेले जिवाणू आणि किटाणू हळूहळू मरतात त्यामुळे घशाची सूज कमी होते आणि वेदनामुक्त होता येते. हर्बल चहा तयार करण्यासाठी ग्रीन टी मध्ये लवंग, वेलदोडा आणि दालचिनी घालून पिऊ शकता. त्याशिवाय आले आणि मध घातलेला चहा देखील टॉन्सिल्सवर प्रभावी उपचार आहे.
 
दालचिनीमध्ये वेदना कमी करण्याचे आणि मधामध्ये जिवाणूरोधक गुण आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टी टॉन्सिल्सच्या आजारावर उपयु्रत ठरतात. त्यासाठीदालचिनी कुटून घ्यावी. 2 चिमटी दालचिनी एक चमचा मधामध्ये मिसळून दिवसातून तीन वेळा याचे सेवन करावे. यामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होऊन संसर्ग कमी होण्यासही मदत होईल. अनेकदा टॉन्सिल्समुळे शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण होते. शिंगाड्यामध्ये आयोडीन असते. त्यामुळे टॉन्सिल्सच्या समस्येपासून आराम मिळतो. शिंगाडे कधे किंवा उकडूनही खाता येतात. त्याशिवाय शिंगाडे सोलून ते पाण्यात उकळावे. या पाण्याने गुळणा केल्यास टॉन्सिल्सचा त्रास बरा होतो