1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (20:29 IST)

Health Tips : हंगामी आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आहारात या गोष्टी समाविष्ट करा

health Care Tips for Relief from many seasonal ailments Include these in your diet to get rid of seasonal illnesses Health Care Tips iN Marathi Health Tips :  हंगामी आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आहारात या गोष्टी समाविष्ट करा  In MArathi Webdunia MarathI
या थंडीच्या ऋतूत शरीराला उष्णतेची गरज असते. अशा परिस्थितीत आहारात विविध प्रकारचे पदार्थ समाविष्ट करावे जेणेकरून निरोगी आणि उबदार वाटेल. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळांचाही समावेश करू शकता. चला तर मग हिवाळ्यात फायदेशीर फळे आणि भाज्यांना बद्दल जाणून आहारात आल्याचा समावेश करा
 
आले Ginger- आलं हिवाळ्याच्या मोसमात खूप फायदेशीर मानले जाते. त्याची चव खूप गरम असते. तसं तर हिवाळ्यात बहुतेक घरांच्या चहामध्ये आलं नक्कीच टाकले जाते. याशिवाय तुम्ही त्याचा काढा बनवून देखील सेवन करू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवून वजन कमी करण्यास मदत करतात. सर्दी, खोकला यांसारखे मौसमी आजार बरे करण्यासाठीही हे खूप गुणकारी आहे.
 
खजूर Dates-हिवाळ्यात आहारात खजूरचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे फळ आणि ड्राय फ्रूट्स अशा दोन्ही प्रकारात येते. त्याची तासीर खूप गरम असते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच हे शरीरात उष्णता आणण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
 
लसूण Garlic-लसणाचा प्रभाव अतिशय उष्ण मानला जातो. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. लसण आपण भाज्या, गार्लिक ब्रेड आणि सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये टाकून वापरू शकता. यापेक्षा जास्त फायदे हवे असतील तर सकाळी रिकाम्या पोटी लसूण मधासोबत खावे. यामुळे तुम्हाला अनेक हंगामी आजारांपासून मुक्ती मिळते.