बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हाय ब्लडप्रेशर सामान्य करण्यासाठी एक वेगळा उपाय

हाइ ब्लडप्रेशर आणि लो ब्लडप्रेशर दोन्ही घातक तेव्हा होतात जेव्हा हा रोग लागतो. डॉक्टरांच्या मते ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांना स्ट्रोक येण्याची आशंका असते, पण एक रिसर्च मध्ये समोर आले की, ज्यांना लो ब्लडप्रेशर आहे त्यांना पण स्ट्रोक येऊ शकतो. आशात हाय ब्लडप्रेशरला सामान्य करण्यासाठी एक वेगळा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने लक्षात ठेवा-
 
१. मिठाचे सेवन कमी प्रमाणात करा. 
२. दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या.
३. कोणत्याही प्रकाराचे लिक्विड जसे की दूध, ताक, ज्यूस, लस्सी यांनी शरीराला हायड्रेड ठेवा.
४. ताण घेऊ नका.
५. मद्यपान व धूम्रपान यांपासून दूर रहा.
६. हिरवा भाजीपाला आणि फळे खा.
 
वेगळा उपाय : आंघोळ केल्यानंतर लगेच एक ग्लास थंड पाणी प्या याचबरोबर दिवसातून कमीतकमी तीन ते चार वेळा हाथ, पाय आणि चेहरा धुवा. यामुळे दिवसभर ब्लडप्रेशर सामान्य राहिल. 
 
हे उपाय करुन बघा-
१. शीतली प्राणायाम : सगळ्यात आधी आपण अनुलोप-विलोम याचा अभ्यास करा. मग सुखासन मध्ये बसून जिभेला बाहेर काढून नळीप्रमाणे बनवा आणि मुखावटे श्वास मध्ये ओढ़ा. श्वास आत घेतल्यावर जीभ मधे करून तोंड बंद करा आणि नाकाने हळू-हळू श्वास बाहेर काढ़ा. ही क्रिया पाच वेळेस करा आणि नंतर धीरे धीरे वाढवून ५० ते ६० वेला करा.
 
२. ध्यान : सिद्धासन मध्ये बसून डाव्या हाताला आपल्या काखेत ठेवा व उजव्या हाताला डाव्या हाता वर ठेवा. तळ हात वरच्या बाजूला असावे आता दोन्ही हातांच्या अंगठ्यांच्या आग्रभागला एकमेकाला जुळुन घ्या मग डोले बंद करून श्वासाच्या येण्या-जाण्याची प्रक्रिया आत्मसात करा. ही मुद्रा पूर्ण स्नायु मंडळ ला आणि मनाला शांत करते.
 
३. शवासन : शवासन कसे करायचे हे सगळेजण जाणतात. हा पूर्ण शरीराच्या शिथीलीकरणचा अभ्यास आहे. हे आसन करण्यासाठी पाठीच्या बाजूने झोपून जा. सगळे आंग आणि स्नायूंना सैल सोडून दया. चेहऱ्याचा तणाव काढून टाका. आता हळू-हळू मोठा श्वास घ्या तसेच झोप येत असल्याचे जाणून याचा अभ्यास प्रतिदिन १० मिनिट करा.