शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 30 मे 2018 (17:32 IST)

या पाच गोष्टी वाचून सोडून द्या सिगारेट पिणे

जर आपण धूम्रपान पूर्ण पणे त्याग करण्याचे ठरवले असेल तर हे टिप्स आपल्यासाठी मदतगार सिद्ध होतील. जाणून घ्या उपयोगी टिप्स:
 
आपण विचार करत असाल की हळू-हळू ही सवय सोडू तर ते शक्य नाही. एकदाच काय ते निर्णय घेऊन आज पासून मन तयार करा.
 
धूम्रपान सोडल्यावर आपल्याला आधीपेक्षा अधिक भूक लागू शकते. अशात खूप गोड किंवा फॅट्स आढळणारे पदार्थ खाण्यापेक्षा हिरव्या भाज्या आणि फळ खावे. 
 
सवय सोडणे अशक्य जाणवत असल्यास स्वत:ला प्रोत्साहित करा आणि आत्मविश्वास ढवळू देऊ नका. आपल्या प्रयत्नाला यश नक्कीच यश मिळेल.
 
या पासून बचावासाठी स्वत:ला आवडीच्या कार्यात व्यस्त ठेवा, असे काम करा ज्यात आपल्याला आनंद मिळत असेल. ताणापासून दूर राहा कारण ताण धूम्रपान करण्यासाठी प्रेरित करतं.
 
धूम्रपान सोडल्यामुळे आपल्याला पचन संबंधी समस्या उद्भवू शकतात किंवा आरोग्यावर विपरित परिणाम जाणवू शकतो. समाधानसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा आणि स्वत:च प्रयत्न सुरु ठेवावे.