फ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट
टमी फ्लॅट असावी ही प्रत्येकाची इच्छा असते, पण अनेक लोकांना वाटतं की यासाठी जिममध्ये जाऊन मेहनत करावी लागणार. पण येथे आम्ही असे काही उपाय शेअर करत आहोत की आपल्या जिम जाण्याची किंवा खूप मेहनत घ्याची गरज नाही. आपल्या दिवसातून फक्त 15 मिनिट द्याचे आहे आणि आपण स्लिम आणि फीट दिसाल. येथे देण्यात येत असलेले सर्व उपाय केल्यास चांगले परिणाम मिळतील तरी शक्य नसल्यास एक किंवा दोन निवडू शकता:
* पाठीवर लेटून दोन्ही पाय उंच करा. दोन्ही पाय एकाच वेळी गुडघ्याने पोटाकडे वळवा. 5 सेकंद हाताने पायांना पकडून ठेवा. पाय सरळ करा. 10 वेळा हा व्यायाम करा.
* पाठीवर लेटून दोन्ही पाय स्ट्रेट वर करा. हळू-हळू उजवा पाय खाली आणून सरळ करा. मग डावा पाय खाली आणत उजवा पाय पुन्हा उंच करा. कातरी प्रमाणे हा व्यायाम 10 वेळा करा.
* पाठीवर लेटून पाय स्ट्रेट वर करा. काही सेकंदासाठी थांबून पाय खाली आणत 45 डिग्रीचा कोण बनवा. काही सेकंद असेच राहू द्या. ही प्रक्रिया 10 वेळा करा.
* पाठीवर लेटून जा. हात डोक्याखाली ठेवून पायाने सायकल चालवा. यासोबत हाताच्या कोपर्याने गुडघे टच करण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा रिपीट करा.
* पाठीवर लेटून श्वास आत घेऊन दोन्ही हात कानाच्या बाजूने सरळ करा. नंतर अर्ध उठून दोन्ही हाताने पायांना व्ही पोझिशन बनवून ही प्रक्रिया 10 वेळा रिपीट करा.
* पालथे लेटून जा. आता पायाच्या पंज्यावर आणि तळ हाताच्या साहाय्याने शरीर उचला. 10 सेकंद याच स्थितीत राहा. 10 वेळा ही प्रक्रिया करा.
* एका कुशी लेटून जा. एक हात आणि पायाच्या साहाय्याने शरीर उचलून 30 सेकंद अश्या स्थितीत राहा. 10 वेळा करा.