मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

आपण स्थूल नसालही कदाचित पण वाढलेल्या पोटामुळे फिगर गडबडतंय... तर काळजी करण्याचे कारण नाही. या 5 टिप्स अमलात आणा आणि स्लिम आणि स्मार्ट दिसा: 


 
थोडं- थोडं खावं: जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.

2. गरम पाणी: पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले परिणाम बघायला मिळतील.


3. मॉर्निंग वॉक: पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी करण्यासाठी योग्य विकल्प आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल.

 

4. नौकासन: योगाने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.


5. रात्री उशिरा जेवू नये: उशिरा डिनर करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही लाइट आहार घ्या. याव्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली कण्यासाठी वेळ मिळत असेल तर आरोग्यासाठी याहून छान गोष्ट काय असू शकते.