सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

मेनोपॉजदरम्यान हेल्दी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे

महिलांना मेनोपॉजदरम्यान हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची गरज असते, म्हणून महिलांनी आपल्या डायटमध्ये हिरव्या भाज्या आणि डाळींचा जास्तीत जास्त प्रमाणात समावेश केला पाहिजे.
 
कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्‍ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे. अधिक मात्रेत साखर आणि मीठ घेतल्याने मधुमेह व उच्च रक्‍तदाबाची समस्या उद्भवू शकते, म्हणून या पदार्थांचे सेवन कमी मात्रेत करणे आवश्‍यक आहे. या काळात महिलांनी कमीत कमी दीड कप फळांचा गर आणि 2 कप भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे. या काळात हाडे ठिसूळ होण्यास सुरूवात होते, तेव्हा हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिटे सकाळी कोवळ्या ऊन्हात थांबणे आवश्‍यक आहे. अशाने ड जीवनसत्व मिळण्यास मदत होते आणि हाडांना मजबुती मिळते. आपल्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी चरबीयुक्‍त पदार्थांना आपल्या आहारातून वजा करायला सुरूवात करायला हवी. यासंदर्भात एखाद्या तज्ञ व्यक्‍तीला अथवा आहारतज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्याने योग्य ते डाएट सुरू केल्यासही चांगला फरक जाणवू शकतो. हे तज्ज्ञ तुमच्या शारीरिक रचनेनुसार आणि तब्येतीनुसार यावर चार्ट बनवून देऊ शकतात.