1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (10:50 IST)

उन्हाळ्यात त्वचेवर कांदा चोळण्याचे फायदे जाणून घ्या

importance of onion in summer
उन्हाळ्यात आपल्या जवळपास आणि कपड्यांमध्ये कांदा ठेवल्याने उष्माघातापासून बचाव होतो. त्याचे सेवन करणे आरोग्यास फायदे देते. परंतु त्याशिवाय ते त्वचेवर चोळण्याचेही बरेच फायदे आहेत. आपण त्यांचे फायदे जाणून घेऊ या.
1 उन्हाळ्यात कांदा केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचेवर चोळण्यासाठी देखील वापरला जातो. याने त्वचेची उष्णता शांत होतेच तसेच शरीराचे तापमान पण संतुलित राहतं. 
2 पायाच्या तळाच्या होणाऱ्या जळजळ पासून आराम मिळण्यासाठी पायाच्या तळाला कांदा चोळल्याने त्वरित आराम पडतो. तसेच उष्माघातापासून आपले रक्षण देखील होते.
3 त्वचेचे संसर्ग दूर करण्यासाठी कांद्याचा रस किंवा किसलेला कांदा लावल्याने त्वचेचे संसर्गापासून रक्षण होते.
4 डास चावल्यावर लालसर मुरूम किंवा फोड त्वचे वर येतात आणि त्वचा थोडी सुजते. त्यावर कांद्याला कापून लावल्याने वेदनेपासून मुक्ती मिळते. तसंच लालसरपणा देखील कमी होतो.
5 डोक्यावरील त्वचेवर कांद्याला चोळल्याने केस गळती होणे कमी होते. तसेच केसांमध्ये होणाऱ्या उवांचा नायनाट होतो.