शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (21:13 IST)

काय सांगता उन्हाळ्यात एसी शिवाय सुद्धा आपलं घर थंडगार ठेवता येऊ शकतं

उन्हाळ्याने आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे. या दरम्यान आपले घर थंड ठेवायला काही न काही उपाय योजत आहोत. सततचे वाढणारे तापमान आणि बदलणारे हवामान आपल्या पर्यावरणाला घातक ठरत आहे. 

उन्हाळ्या पासून बचाव करण्यासाठी आपण काही उपकरणे वापरतो ज्यामुळे आपल्या पर्यावरणाला ते घातक असतात. त्याच बरोबर आपल्या पृथ्वीचे तापमान सरासरीने वाढतात. सध्याचा आधुनिक वैभवाने युक्त असलेल्या काळात एसी (एअर कंडिशनर) शिवाय घराला थंड ठेवणे अशक्य आहे, पण आपले पूर्वज आपले घर थंड ठेवण्यासाठी काही सोपे उपाय योजत होते. 
 
सध्याचा काळात एसी वापरल्याने विजेचे भले-मोठे बिल येते. पूर्वीच्या काळात असे काही होत नव्हते. कमीत कमी खर्च करून ते आपल्या घराला थंडगार ठेवायचे. सध्याचे करोनामुळे सर्व आपापल्या घरातच आहे. अशावेळी वाढत्या उन्हाळ्या पासून संरक्षणासाठी आणि आपल्या घराला थंड ठेवण्यासाठी काही (इको फ्रेंडली ) पद्धतींचा वापर करून आपण आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवू शकतो. सध्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आणि तसेच घराला थंड ठेवण्यासाठी फक्त एअर कंडिशनरचं एकमेव पर्याय नाही. आपल्या घराला उन्हाळ्यातही थंडगार ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत. अश्याच काही उपाय योजनेबद्दल जाणून घ्या 
 
1 घराला रंग देणे - 
घराच्या भिंती आणि छतापासून घराचे तापमान वाढते. भिंती आणि छताला थंड ठेवण्यासाठी आपण पांढरा रंग निवडला पाहिजे. याने तापमानात 5 ते 10 अंशांनी कमी होते. घरातील बाहेरच्या भिंतींना थंड ठेवण्यासाठी हीट रिफ्लेक्टीव पेंट करविण्यात येते. आणि छतासाठी फॉल सीलिंग करवणे हे एक चांगले उपाय आहे. असे केल्याने छताखाली एक अतिरिक्त थर तयार होते. आणि उन्हामुळे घराची छत तापल्याने घराची खोली तापत नाही. घराच्या भिंतींना ऑयल बेस्ड रंग करण्याऐवजी वॉटर बेस्ड रंग करावे. हे उष्णतारोधक असल्याने उन्हाळा रोखण्यासाठी प्रभावी असते. काही घर अशी असतात ज्यांचा खोलीवर थेट गच्ची असते. त्यामुळे छत लवकर तापते. घरातील फारश्या लगेच तापतात. त्यापासून वाचण्यासाठी फरशींवर रिफ्लेक्टीव टाइल्स लावायला हव्या. जेणे करून आपल्याला उष्णता आणि ऊन सोसावे लागणार नाही. 
 
2  इलेक्ट्रानिक्स उपकरणांपासून लांबच राहावे - 
इलेक्ट्रानिक उपकरणांच्या उपयोगामुळे घरातील तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असते. कॉम्प्युटर आणि लॅपटॉप काम नसताना बंद ठेवावे. टीव्ही पण उगाचच चालू ठेवायला नको. ज्या खोलीत दिवसभर दिवे लागलेले असतात किंवा दिवसभर टीव्ही सुरू असतो त्या खोलीचे तापमान वाढलेले असतात. शक्य असल्यास घरामध्ये एलईडी किंवा सीएफएल लावायला हवे. हे कमी उष्णता पसरवतात. जेणे करून आपले घर थंड राहील. स्मार्ट पावर स्ट्रिप्स सारखे उपकरणाचा वापर करावा हे उपकरण काम नसताना आपोआप बंद होतात. थंड पाणी घेण्यासाठी आपण वारंवार फ्रीज खोलता यामुळे फ्रीज वर जास्त भार येतो. तापमान स्थिर ठेवण्यासाठी फ्रीजच्या मोटारला अतिरिक्त उष्णता तयार करावी लागते. अशामुळे ज्या ठिकाणी फ्रीज ठेवले आहे तिथले तापमान वाढते. या पासून वाचण्यासाठी एखाद्या फ्लास्क मध्ये थंड पाणी टाकावे. जेणे करून आपल्याला वारंवार फ्रीज खोलावे लागू नये. वाशिंग मशीन, डिशवॉशर, ओव्हनचा वापर ऊन तापल्यावर करू नये. 
 
3 घरातील झाडं कमी करतील प्रभाव - 
तापमानाला कमी करण्यासाठी हिरवळ एक सोपा आणि चांगला मार्ग आहे. घराच्या बाहेर तर आपण हिरवळी साठी आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी झाडं लावतच असतो त्याच बरोबर आपल्याला घराच्या आतमध्ये देखील झाडं लावता येऊ शकतात. आपल्या घराच्या खोल्या थंड ठेवण्यासाठी घराच्या आतमध्ये झाडं लावता येतात. सध्या अनेक इनडोर झाडं मिळत फॅशनमध्ये देखील आहेत. हे आपलं घर थंड ठेवण्यास मदत करतात. संशोधनानुसार घराच्या आत लावलेली झाडे घरातील तापमानाला 10 ते 15 अंशाने कमी करतात. घराच्या प्रवेश द्वारा आणि व्हरांड्याच्या जवळ झाडं ठेवल्यास उष्णतेच्या तापमानाला कमी करण्यास सोपे जाते. ह्यांच्या मुळे सोडल्या जाणाऱ्या प्राणदायीनी वायू ऑक्सिजन मुळे पूर्ण घर थंड राहते. ही झाडं नैसर्गिक वातानुकूलित म्हणून काम करतात. उंच आणि मोठी झाडं खिडक्यांजवळ ठेवावे जेणे करून घरात थेट उन्हाची झळ येणार नाही. 
 
4 क्रॉस व्हेंटिलेशन असणे महत्त्वाचे - 
नैसर्गिकरीत्या आपले घर थंड ठेवण्यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन एक चांगला मार्ग आहे. जेणे करून गरम हवा घरा मधून बाहेर जाऊन बाहेरची थंड हवा आत येऊ शकते. या साठी सकाळ आणि संध्याकाळ घराचे दारे -खिडक्या उघडे ठेवावे. दुपारच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवल्यास घर तापेल. आपण घरात व्हेंटिलेशन फॅन लावू शकता हे खोलीतल्या गरम हवेला बाहेर काढण्याचे काम करतात. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी घराच्या उलट्या दिशेने खिडक्या उघडणे आवश्यक आहे. 
 
5 हवेदार पडदे लावावे - 
घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्याने संपूर्ण घरात नैसर्गिक शुद्ध हवा येत राहते. खिडक्यांना जाड पडदे हिवाळ्यात चांगले ठरतात. उन्हाळ्यात हलक्या रंगाचे पडदे लावायला हवे. जेणे करून हवेचे प्रवेश सहजरीत्या होऊ शकेल. या साठी हलक्या रंगाच्या सुती पडद्यांच्या वापर करावा. पलंगावरची चादरसुद्धा सुती आणि छोट्या प्रिंटची असावी.
 
6 खसखस आपली मदत करेल - 
खसखसचे पडदे पाण्यात भिजवून ठेवून लावल्याने घरातील उष्णता कमी होते. हे पडदे उष्णता कमी करण्यात मदत करते. हे गरम हवेला घरात येऊ देत नाही. या वर पाणी टाकल्याने पाण्याचे वाष्पीकरण होऊन थंड हवा मिळते. खिडक्या आणि व्हरांड्यात सुद्धा ब्लाइंड्सचा वापर केला जाऊ शकतो. या मुळे उन्हाची झळ घरात येत नाही आणि घर थंड राहतं. 
 
घराला थंड ठेवण्यासाठी हे करावे - 
मातीचा माठ - पाणी थंड करण्यासाठी फ्रीजऐवजी मातीची भांडी जसे माठ, सुरईचा वापर करू शकतो. हे मातीचे भांडे फक्त पाणी थंड करण्यासाठी नव्हे तर खाद्यपदार्थ सुद्धा थंड ठेवतात. 
 
जड सामान काढून टाका - हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू कार्पेट, दुलई, कांबळे, याना बांधून पेटीत घालून ठेवावे. हीटर सारखे उपकरण सुद्धा बांधून ठेवावे. असे केल्यास घरात मोकळीक जागा मिळेल आणि शुद्ध हवा घरात येत जात राहील.
 
एक्झास्ट फॅन वापरावे - स्वयंपाक करताना, स्वयंपाक झाल्यावर, अंघोळ केल्यावर स्नान घरातील एक्झास्ट फॅन चालू करावे. असे केल्यास तेथील गरम आणि दमट वार बाहेर पडून घरात थंडावा येईल. 
 
घरात कालीनचा वापर टाळावा- घरातील सौंदर्य वाढविण्यासाठी आपण कालीनचा वापर करतो. असे केल्यास घर उष्ण राहते. मोकळी फरशी थंड असते. उन्हाळ्यात कालीन किंवा कार्पेटचा वापर करणे टाळावे.
 
पाणी शिंपडावे - उन्हाळ्यात दर रोज गच्चीवर पाणी शिंपडावे. असे केल्यास आपल्या घरात थंडावा येऊ शकतो. बहुमजली घर असल्यास आपण आपल्या बाल्कनीमध्ये पाणी शिंपडू शकतात.