शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (16:33 IST)

राज ठाकरे यांनी 'असा' साजरा केला ‘वर्ल्ड कार्टुनिस्ट डे’

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपले वडिल श्रीकांत ठाकरे यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवले. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी ‘चेहरे मोहरे’ हे पहिलं प्रदर्शन भरवत आपल्या दोन्ही गुरूंना मानवंदना दिली होती. त्या प्रदर्शनाची झलक दाखवणारी चित्रफीत ‘वर्ल्ड कार्टुनिस्ट डे’च्या निमित्तानं राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.
 
अवघ्या काही वेळत त्यांची ही चित्रफित मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या प्रदर्शनाची चित्रफित राज ठाकरे यांनी शेअर केली आहे. या प्रदर्शनादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी हेदेखील उपस्थित होते. तसंच त्यांच्या प्रदर्शनाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित हेदेखील उपस्थित होते.