शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मे 2020 (17:04 IST)

‘हर्बल ड्रिंक’ कोरोना विषाणूला बरे करते ? खर की काय

टांझानिया आणि काँगोसारख्या देशांमध्ये लोकांना वाटते की ‘हर्बल ड्रिंक’ कोरोना विषाणूला बरे करू शकते. दरम्यान, तीन आठवड्यानंतर २० पेक्षा कमी लोकांवर याची चाचणी केली असून त्यानंतर हर्बल ड्रिंक ‘कोविड-ऑर्गेनिक्स’ म्हणून या ड्रिंकचे लाँचिंग करण्यात आले आहे.
 
टांझानियाच्या राष्ट्रपतींनी याबाबत दावा केला आहे. ते म्हणतात की, ‘कोराना या विषाणूवर मात करण्यासाठी ‘हर्बल ड्रिंक’ हे एक औषध आहे. त्यामुळे कोरोनावर मात करता येणार आहे. तसेच या औषधाच्या आयातीकरता त्यांनी लोकांना वचन देखील दिले आहे की ते ‘हर्बल ड्रिंक’ आयात करण्यासाठी मेडागास्कर विमान पाठवतील’. तसेच राष्ट्रपती जॉन मगुफुली ‘हर्बल ड्रिंक’ कोरोना विषाणूचे औषध म्हणून प्रसार देखील करत आहेत. तर टांझानिया व्यतिरिक्त कॉंगोच्या राष्ट्रपतींचेही असेच म्हणे आहे की, ‘हर्बल ड्रिंक’ आर्टेमीझिया नावाच्या वनस्पतीपासून हे औषध बनविलेले असून या वनस्पतीचा मलेरियाकरता देखील वापर केला जातो.
 
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने याला स्पष्ट नकार दिला आहे, ते म्हणतात की, ‘कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही. तसेच लोकांनी कोणतेही औषध स्वत:च्या मर्जीने घेऊ नये असे स्जापष्गट केले आहे.