शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 10 जानेवारी 2024 (18:01 IST)

Kadipatta दररोज कढीपत्ता सेवन केल्याने होतील कमालीचे फायदे

Kadipatta khanyache fayade : कढीपत्त्याला खूप ठिकाणी कढीपत्ताच म्हंटले जाते. हा गोड असतो जो नेहमी कढीमध्ये चव येण्यासाठी टाकला जातो. कढीपत्ता आरोग्यासाठी खूप चांगला असतो. कढीपत्ता दररोज सेवन केल्यास नक्कीच फायदा होईल.
चला जाणून घेऊ या कढीपत्ता सेवन केल्याचे फायदे :

* कढीपत्ता सेवनाने केस मजबूत बनतात -
दररोज कढीपत्ता सेवनाने केस मजबूत बनतात तसेच, केस गळणे देखील कमी होते. कारण कढीपत्ता सेवनाने विटामिन, फॉस्फोरस आणि आयरन सोबत मुबलक प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. जे केसांना आतून पोषण देतात व मजबूत बनवतात . जर केसांना काले आणि घनदाट बनवायचे असतील तर नारळाच्या तेलात कढीपत्ताचे पाने टाकून ते उकळून घ्या व केसांना लावून चांगल्या प्रकारे मॉलिश करा . 
* शरीरात रक्ताची कमतरता  दूर करते-
आयरन आणि फॉलिक एसिडचे एक चांगले स्त्रोत आहे. कढीपत्ता अ‍ॅनिमिया सारख्या समस्यांपासून वाचवते . अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी होय. म्हणून रिकाम्या पोटी कढीपत्ता सेवनाने नक्कीच लाभ होतो. 

* पचन क्रियेमध्ये सहाय्यक कढीपत्ता -
पचन संबंधी समस्या असेल किंवा दस्त लागल्यावर कढीपत्त्याला वाटून ताकात घेतल्याने आराम मिळतो. हा पोटातील गडबडीला शांत करतो आणि पोटा संबंधी सर्व समस्यांचे निवारण करतो. 

*मधुमेहासाठी  फायदेशीर -
मधुमेहाचे रुग्ण असल्यास दररोज जेवणात कढीपत्ताचे सेवन केल्याने तुम्ही या समस्येपासून 
नक्कीच मुक्त होऊ शकतात रक्तातील साखरेची पातळीला  नियंत्रित करण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन आरोग्यदाई आहे . 

* कफ आणि सर्दी-
सर्दी कफ झाल्यानंतर कफ छातीत जमा होतो व तो घट्ट होतो, तर यापासून आराम मिळण्यासाठी कढीपत्ता 
कारागार  सिद्ध होतो. 

*त्वचारोग यासाठी आरोग्यदायी -
  त्वचा रोग संबंधी समस्यांवर  कढीपत्ता फायदेशीर असतो.अंगावर पुरळ येत असतील 
किंवा काही अन्य त्वचेच्या समस्या असतील तर दररोज कढीपत्ताचे  सेवन करावे व त्याची पेस्ट बनवून लावावे.  

* रोज प्रतिकारक शक्तीला बळकट करते - कढीपत्ता अँटीऑक्ससिडेन्ट असल्याने त्यात असलेली अँटीऑक्ससिडेन्ट ऑक्सीडेटिव 
तणाव ला कमी करते आणि रोगाशी लढायला मदत करते. 

* डोळ्यांसाठी उपयोगी- कढीपत्त्यात असलेले विटामिन ए हे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करते जेवणानंतर 
कढीपत्त्याचे सेवन केले पाहिजे तसेच याला सकाळी रिकाम्यापोटी मधासोबत पण घेऊ शकतात . 

* वजन कमी करण्यासाठी सहाय्यक- कढीपत्त्यात असलेले अँटिओबेसिटी आणि लिपिड हे घटक वजन वाढू देत नाही . 

* कॉलेस्ट्राँल  पातळी नियंत्रित ठेवते - कढीपत्ता हा कॉलेस्ट्राँल पातळी नियंत्रित ठेवतो सकाळी रिकाम्यापोटी पाच ते 
सहा कढीपत्ताचे पाने चावून खाऊन त्यावर कोमट पाणी पिणे आरोग्यदायी आहे. 

* गॅससाठी फायदेशीर- कढीपत्ता मध्ये असलेले कार्मिनेटिव गुण हे गॅस आणि सूज वर नियंत्रण करण्यासाठी मदतगार 
आहे. 

* मॉर्निग सिकनेसला दूर ठेवते- सकाळी उठल्यावर खुप लोकांना मॉर्निग सिकनेस होतो . म्हणजे उलटीसारखे होते आणि मळमळते . आशा वेळेस कढीपत्त्याचे सेवन या समस्येला दूर ठेवते. 
आशा प्रकारे दैनंदिन जीवनात कढीपत्त्याचे महत्व खूप आहे.