1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified मंगळवार, 25 मे 2021 (20:10 IST)

छोट्या वेलचीचे आणि मोठ्या वेलचीचे 20 फायदे जाणून घ्या

वेलचीचा वापर बहुतेक घरात मुखवास किंवा मसाला म्हणून केला जातो. ही दोन प्रकारात येते - हिरवी किंवा छोटी वेलची आणि मोठी वेलची. मोठी वेलची मसाल्याच्या रूपात पदार्थांना चविष्ट  बनविण्यासाठी वापरली जाते,तर हिरवी वेलची मिठाईचा सुगंध वाढविण्यासाठी वापरतात.
वेलचीचा वापर पाहुणचारात देखील केला जातो.परंतु वेलचीचे महत्त्व केवळ या पुरतीच मर्यादित नाही. हे औषधी गुणधर्मांची खाण आहे. चला,वेलचीचे औषधी गुणधर्म जाणून घ्या.
 
लहान वेलची आणि मोठी वेलचीचे 20 मुख्य फायदे जाणून घ्या-
 
1 खवखव -आवाज बसला असेल किंवा घसा खवखवत असेल तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी छोटी वेलची कोमट पाण्यासह चावून चावून खा.
 
2 सूज- घश्यात सूज आली असेल तर मुळाच्या पाण्यात छोटी वेलची पूड घालून प्यायल्याने फायदा होतो.
 
3 खोकला- सर्दी, खोकला आणि शिंका येत असल्यास एक लहान वेलची,एक आल्याचा तुकडा,लवंग आणि तुळशीची 5 पाने एकत्र करून विड्यात घालून खावे.  
 
4 उलट्या- पांच ग्रॅम मोठी वेलची घेऊन अर्धा लिटर पाण्यात उकळवून घ्या.पाणी एक चतुर्थांश झाल्यावर काढून घ्या.हे पाणी प्यायल्याने उलट्या होणं थांबते.
 
5 अपचन- केळी जास्त प्रमाणात खाल्ल्यास लगेच एक वेलची खावी. केळी पचतील आणि आपल्याला हलकं जाणवेल.
 
6 मळमळ-प्रवासा दरम्यान बसमध्ये बसून बर्‍याच जणांना चक्कर येतात किंवा जीव घाबरतो. त्यापासून मुक्त होण्यासाठी तोंडात एक छोटी वेलची ठेवा. 
 
7 छाले - तोंडात छाले झाले असल्यास मोठी वेलची वाटून त्यात खडीसाखरेचा पूड मिसळून जिभेवर ठेवा, त्वरितच फायदा होईल.
 
8 मोठ्या वेलचीचा चहा-हिवाळ्याच्या हंगामात सर्दी-पडसं झाले असल्यास मोठ्या वेलची चा चहा किंवा काढा बनवून प्यायल्याने आराम होतो.
 
9 कॅफिन आणि विषारी पदार्थ-मोठी वेलची शरीरात एक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. हे आपल्या शरीरातून कॅफिन आणि विषारी पदार्थ काढून टाकते. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो आणि त्वचा उजळते.
 
10 कर्करोग- मोठ्या वेलचीमध्ये अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात आढळते.जे कर्करोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 
 
11 मजबूत केस- या मध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंटीव्ह आपल्या टाळूच्या त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे केस अधिक मजबूत होऊ लागतात.
 
12 तणाव आणि घाबरणे-जर एखाद्याला लवकरच तणाव,थकवा आणि घाबरणे सारखे त्रास होत असेल तर मोठी वेलची बारीक करून मधात मिसळून घ्यावी.फायदा होईल.
 
13 डोकेदुखी-डोकेदुखीचा त्रास असल्यास मोठ्या वेलचीचे सेवन करणे फायदेशीर आहे.
 
14 दातदुखी-मोठी वेलची आणि लवंग तेल सम प्रमाणात घ्या. हे दातांवर चोळल्याने दातदुखीचा त्रास नाहीसा  होतो.
 
15 मोठ्या वेलचीचा काढा- 4-5 मोठ्या वेलचीची फळे 400 मिली पाण्यात उकळवून घ्या. या काढ्याचे गुळणे केल्याने दातदुखीचा त्रास बरा होतो.
 
16 तोंडात सूज येणे- 2-३ मोठी वेलचीची साले बारीक करून ती भुकटी खाल्ल्याने दाताचे आजार आणि तोंडात सूज येणे कमी होते.
 
17 जास्त थुंकी येणे- जर तोंडात जास्त लाळ येत आहे किंवा थुंकी येत आहे तर  मोठी वेलची आणि सुपारी समप्रमाणात एकत्र दळून घ्या.याची 1-2 ग्रॅम मात्रा घेऊन चघळत राहा असं केल्याने थुंकी आणि लाळ वाहणे थांबते.
 
18 श्वसन रोग- 5-10 थेंब मोठ्या वेलचीच्या तेलात खडी साखर मिसळून नियमितपणे सेवन केल्यास श्वसन रोगात आराम मिळतो.  
 
19 भूक न लागणे- एक ग्रॅम मोठ्या वेलची बियाणाच्या भुकटी मध्ये  4 ग्रॅम खडी साखर मिसळून सकाळी व संध्याकाळी 1 ग्रॅम घेतल्याने भूक न लागण्याच्या समस्येस गरोदर स्त्रीला आराम मिळतो.
 
20 तोंडाला वास येणे-जर आपल्या तोंडाचा वास येत असेल तर मोठी वेलची चावणे हा एक चांगला उपाय आहे. याशिवाय तोंडातील जखमा बऱ्या करण्यासाठी मोठ्या वेलचीचा वापर केला जाऊ शकतो.