कडुलिंबाचे फायदे जाणून घ्या
अँटिबायोटिक घटकांनी समृद्ध कडुलिंबाला सर्वोच्च औषध म्हणून ओळखले जाते. हे चवीत कडू असते , परंतु त्याचे फायदे अमृतसारखेच आहेत.कडुलिंबाकडेआपल्या सर्व समस्यांवर उपचार आहे, चला कडुलिंबाचे 10 औषधी गुणधर्म जाणून घ्या.
1 विंचू ,गांधीळमाशी सारखे विषारी कीटक चावले असल्यास कडुलिंबाची पाने बारीक वाटून कीटक चावलेल्या जागी लेप बनवून लावल्याने विष पसरत नाही आणि आराम देखील मिळतो.
2 कोणत्याही प्रकारची जखम झाली असल्यास कडुलिंबाची पाने वाटून त्याचा लेप लावणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय ऑलिव्ह ऑईल बरोबर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्यास जुना जखमा देखील बऱ्या होतात.
3 खाज किंवा खरूज झाले असल्यास कडुलिंबाची पाने दह्यासह वाटून लावल्याने आराम मिळतो आणि खाज किंवा खरूज च्या त्रास नाहीसा होतो.
4 किडनीमध्ये दगड झाले असल्यास कडुलिंबाच्या पानांना जाळून त्याचा रक्षाची 2 ग्रॅम मात्रा घेऊन दररोज पाण्यासह घेतल्याने पथरी किंवा दगड गळून पडतो आणि मूत्रमार्गाने बाहेर पडतो.
5 मलेरियाचा ताप झाल्यास कडुनिंबाची साल पाण्यात उकळवा आणि काढा बनवा . आता हा काढा दिवसातून तीन वेळा दोन चमचे भरून प्यायल्याने ताप बरा होतो आणि अशक्तपणा जाणवत नाही.
6 त्वचेचे आजार झाल्यास कडुलिंबाचे तेल वापरणे फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या तेलात थोडासा कापूर मिसळून शरीरावर मालिश केल्याने त्वचेचे रोग बरे होतात.
7 कडूलिंबाच्या देठात खोकला,मूळव्याध,जंताचा नायनाट करण्याचे गुणधर्म आहे. हे दररोज चावून खाल्ल्याने किंवा पाणी उकळवून प्यायल्याने फायदा होतो.
8 डोकेदुखी, दातदुखी, हात-पायात वेदना होणे,छातीत दुखणे या समस्या असल्यास कडुलिंबाच्या तेलाने मॉलिश केल्याने फायदा होतो. .याचे फळ कफ आणि कीटनाशक म्हणून वापरले जाते.
9 कडुलिंबाच्या दातूनने दात स्वच्छ होतात. पायोरिया चा आजार देखील नाहीसा होतो. कडुलिंबाच्या पानांचा काढा बनवून त्याने गुळणे केल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहतात. आणि तोंडातून वास देखील येत नाही.
10 चेहऱ्यावर मुरुम असल्यास पाण्यात कडुलिंबाची साल पाण्यात घासून लावल्याने फायदा होतो. याशिवाय कडुनिंबाच्या पानांचा लेप लावल्याने त्वचेच्या रोगाचे जंतु देखील नष्ट होतात. कडुलिंबाच्या तेलात कापूर घालून त्वचेवर लावणे देखील फायदेशीर आहे.