मेथीदाण्याचे 5 फायदे
अन्नाची चव वाढविण्यासाठी मेथीदाण्याचा वापर केला जातो. परंतु आरोग्य आणि सौंदर्य लाभ देखील या मुळे मिळतात. चला याचे फायदे जाणून घेऊ या.
1 मेथीदाण्याची पूड दररोज खाल्ल्याने वजन नियंत्रित होते. चरबीचे प्रमाण कमी होते.अशा प्रकारे आपण आपले वजन देखील कमी करू शकता.
2 मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्याने हृदयरोग दूर राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.
3 मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीदाणा खूप फायदेशीर आहे. दररोज रात्री भिजवल्यानंतर, सकाळी ते चावून खाल्ल्याने फायदे मिळतात.
4 केसांच्या सौंदर्यासाठीही मेथिदाना फायदेशीर आहे. त्याची पेस्ट केसांवर लावल्याने केसांचा रुक्षपणा नाहीसा होतो, तसेच केस अधिक मजबूत होतात.
5 चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यातही हे मेथीदाणा काही कमी नाही. ते वाटून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. याशिवाय कोरड्या त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.