रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (20:16 IST)

या 4 प्रकारे करा वजन कमी

weight
1. औषधे करतात वजन कमी: जर कोणत्याही प्रकारच्या औषधांमुळे वजन कमी होत असतं तर जगात ओव्हरवेट लोकं दिसलेच नसते. वजन कमी करणारे औषधे काही दिवसांसाठी आपल्या वजनावर नियं‍त्रण ठेवतीलही पण थोड्या दिवसांनी त्यांचा प्रभाव संपतो. व्यायाम, योग्य आहार आणि चांगली झोप याने आपले वजन नियंत्रित राहील.
 
2. नाश्ता नको करायला: कित्येक संशोधन पुरावा देऊन चुकले आहे की ब्रेकफास्ट न केल्याने पचन क्रियेवर प्रभाव पडतो. आणि मग दिवसभर अतिप्रमाणात खाल्लं जातं. यामुळे रोज सकाळी असा नाश्ता करणे आवश्यक आहे ज्याने शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळू शकेल.
 
3. विशिष्ट भागाचे वजन कमी करू शकता: हे अगदीच शक्य नाही की कोणतेही दोन-तीन व्यायाम करून आपण फक्त मांड्या किंवा पोटाचे वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी पूर्ण शरीराला व्यायाम हवा.
 
4. व्यायाम केल्या‍विना वजन कमी करणे शक्य नाही: व्यायाम केल्याविनाही वजन कमी केले जाऊ शकता. यासाठी आपल्याला स्वत:च्या आहारामध्ये कॅलरीजचा हिशोब ठेवावा लागेल आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करावा लागेल. जसे खूप वेळ बसून राहणे, वेळी-अवेळी झोपा काढणे, वाटेल तेव्हा खाणे व इतर काही सवयी बदलाव्या लागतील.