बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2024 (11:25 IST)

उष्माघात टाळण्यासाठी उपाय

हिवाळा हृदयरोग्यांसाठी वाईट ठरतो, कारण हृदयाशी संबंधित समस्या याच ऋतूत दिसून येतात. परंतु थंडीच नाही तर अती उष्णतेमुळे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. खरं तर, हवामानात अचानक बदल झाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या या उन्हामुळे हृदयरुग्णांच्या समस्या जास्त प्रमाणात दिसू शकतात.

उष्माघाताची समस्या कोणाला उद्भवते?
उष्माघाताचा त्रास कोणालाही होऊ शकतो, परंतु ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांचा त्रास आहे, त्यांना उष्माघाताचा जास्त धोका जास्त असतो.

उष्माघात टाळण्यासाठी उपाय
जास्त उन्हात जाऊ नका
उन्हाचा पारा दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जास्त असतो. त्यामुळे यावेळी घर किंवा ऑफिसमध्ये रहा. घरातून बाहेर जात असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा. त्याबरोबरच उन्हापासून वाचण्यासाठी छत्री, स्कार्फ सुद्धा जवळ ठेवा. मुलांना, गरोदर महिलांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.
 
नियमित चेकअप करा
कोणताही ऋतू असला तरीही हृदयरुग्णांना नियमित चेकअप करायला हवे, ज्यामुळे तुम्ही तुमची काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकाल.
 
व्यायाम करा
हृदयरुग्णांना हलके व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, जे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थोडे थंड तापमान असताना करावे. जर घाम वाढू लागला किंवा हृदयाचे ठोके वाढू लागले तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
 
जास्त पाणी प्या
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हृदयरुग्णांना त्यांच्या डॉक्टरांनी जी औषधं दिली आहेत ती, त्यांनी नियमित घ्यायला हवी. शिवाय पाणी सुद्धा जास्त प्यायला हवं.

Edited By- Ratnadeep ranshoor