शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (10:51 IST)

मोड आलेल्या मेथीचे आरोग्यलाभ

कोणतेही मोड आलेले कडधान्य शरीराला उपयु्रत ठरते. डॉक्टर सांगतात की, कडधान्ये खा. किंवा मोड आणून त्याची भेळ करुन खा. ही टेस्टी भेळ खाण्यास मजाही येते आणि लहान मुले तर यामुळे निरोगी राहतात. त्यात मेथी हा प्रकार तर हेल्दी आहे. आणि मोड आणलेली मेथी म्हणजे दुधात साखर. इतका उत्तमआणि निरोगी पदार्थ आहे.
 
मोड आलेली मेथी फायदेशीर असते. मधुमेहाच्या आजार कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. वजनाची चिंता असणार्‍यांना मोड आलेले पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. दिवाळी होऊन गेली की प्रत्येकाला वाढणार्‍या वजनाची, ब्लडप्रेशरची आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागते गोड पदार्थ खाण्याचा मोह कुणाचा सुटत नाही परिणाम वजन वाढते. मग ते कमी करण्यासाठी अट्टहास सुरु होतो. यावर उपाय म्हणजे मेथी. मेथीचे लाडू बाळंतिणीसाठी आरोग्यदायी असतात. बाळंतिणीला मेथीचे लाडू देतात. पण मेथीचे लाडू कडू लागतात. म्हणून सगळे खायला काचकूच करतात. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचे पुष्कळ फायदे आहेत.
 
* वजन कमी करण्यास मदत होते. 
* मधुमेह नियंत्रणात राहातो. 
* कोलेस्टेरॉल कमी होते. 
* पचनास मदत होते. 
* छातीतील जळजळ कमी होते. 
* काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयु्रत. 
* बाळंतिणीचे दूध वाढते. यासाठी मेथीचे लाडू किंवा हळीवाचे लाडू देतात. 
* महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मेथी उपयु्रत ठरते. 
* यामध्ये भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर ठरते. 
* सौंदर्य प्रसाधन म्हणूनही मेथीचा वापर केला जातो. 
* केसांच्या समस्येवर मेथी उपयु्रत ठरते. मेथ्या मिक्सरला लावून दह्यामध्ये रात्री भिजत घालावे. केसांना अर्धा तास मॉलिश करावे. अर्धा तासाने केस धुतल्यास केस तजेलदार आणि चमकदार दिसतात.

शैलेश धारकर