1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

बी-12ची जास्त धास्ती हृदयरोग्यांना!

More scared of B-12 to heart patients!
गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्या त्रुटींमुळे कोणत्या व्याधी जडू शकतात हे बारकाईने तपासून पाहण्याच्या अनेक पद्धती विकसीत झाल्या आहेत. हृदयरोगाशी संबंधित अनेक घटक गेल्या काही वर्षांमध्ये समोर आले. 
 
कोलेस्टेरॉलचे प्रमाण हा घटक आता सामान्य बनला आहे. आता कोलेस्टेरॉलप्रमाणेच रक्तातील बी-12 या घटकाचे प्रमाण तपासून पाहणेही महत्त्वाचे असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये रक्ततपासणी करताना बी-12 ची मात्राही तपासून पाहिली जात आहे. बी-12चे प्रमाण भारतीय पुरुषांमध्ये बरेच कमी असते. त्यामुळे हृदयरोगाची शक्यता बळावते, असे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते. 
पुरुषांमध्ये बी- 12चे प्रमाण 200 ते 800च्या घरात असावे असे सांगितले जाते. मात्र अनेक भारतीय पुरुषांच्या शरीरातील हे प्रमाण 150 ते 175च्या दरम्यान असल्याचे दिसून येते. खास इंजेक्शन देऊन किंवा नियमित गोळ्या घेऊन बी-12चे प्रमाण वाढवता येते. त्यामुळे हृदयविकाराचा संभाव्य धोका टळू शकतो. आजघडीला हृदयरोकाला बळ पडणार्‍यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण खूप जास्त आहे.