Morning Walk : पहाटे फिरा, ताजेतवाने राहा!
पहाटे फिरल्याने माणसाला दिवसभर ताजेतवाने राहण्यसाठी मदत मिळते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात ओझोनचे प्रमाण अधिक असल्याने माणसाला हा ताजेपणा लाभतो. ओझेन निसर्गात सामावलेला आहे.
विजेच्या कडकडाटासह जेव्हा पाऊस कोसळतो तेव्हा यातील विद्युतप्रवाहामुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होते. त्या पावसानंतर आपल्याला ताजेतवाने आणि प्रसन्न वाटते. याचे कारण वातावरणातील ओझोनचे असलेले प्रमाण आहे.
वातावरणातील ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होते. सकाळी-पहाटे वातावतरणात ओझोनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी फिरायला गेल्यास ओझोन मिळतो, त्यामुळे आरोग्य सुधारते. मानसिकतेत बदल होतो. त्याचा स्तर उंचावतो. हवा प्रदूषित झाल्याने हवेतील विषारी वायू सर्वत्र पसरतात. त्याने माणसाचे तसेच वनस्पती व प्राण्यांचे जीवन आजरांनी ग्रासले जाते.