बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (22:46 IST)

Mushroom Benefits :वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर आहे मशरूम , असा प्रकारे सेवन करा

mushrooms
Mushroom Benefits :आजच्या काळात लठ्ठपणा ही लोकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात लोक लठ्ठ होत आहेत. त्याचबरोबर वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. काही लोक डाएटिंगचा अवलंब करतात, तर काहीजण जिममध्ये तासनतास घाम गाळण्यात घालवतात. मात्र त्यानंतरही योग्य परिणाम होत नाही आणि त्यांची निराशा होते. काही लोक वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टी त्यांच्या आहारातून वगळतात.

पण काही अशा गोष्टी आहे ज्यांना आपल्या आहारात समाविष्ट करून आपण वेट लॉस करू शकता. त्यापैकी एक आहे मशरूम. मशरूम हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रथिने, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक मशरूममध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्याच वेळी, त्यात खूप कमी कॅलरी असतात. त्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी मशरूमचे सेवन किती फायदेशीर आहे आणि त्याचे सेवन कसे करावे जाणून घेऊ या. 
 
नाश्त्यात मशरूमचा समावेश करा-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात मशरूम खावे. यासाठी तुम्हाला मशरूमचे छोटे तुकडे करावे लागतील. नंतर त्यात ओट्स आणि दलिया मिक्स करून सेवन करा. दुसरीकडे, जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्ही मशरूम ऑम्लेट बनवून खाऊ शकता. मशरूम ऑम्लेट देखील सामान्य ऑम्लेटप्रमाणेच तयार केले जाते. नाश्त्यात मशरूमचे सेवन केल्याने तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा होत  नाही. यामुळे तुमचे वजन कमी करणे सोपे होईल.
 
मशरूम सूप-
वजन कमी करण्यासाठी तुम्ही मशरूम सूपचे सेवन करावे. मशरूम सूप बनवणे खूप सोपे आहे. मशरूम सूप बनवण्यासाठी कांदा, गाजर, आले, मशरूम आणि लसूण बारीक चिरून घ्या. आता एका कढईत तूप गरम करून त्यात आले आणि लसूण घालून परतून घ्या. यानंतर कांदे, गाजर आणि मशरूम घालून 2-4 मिनिटे परतून घ्या. आता चवीनुसार पाणी आणि मीठ घाला. अशा प्रकारे तुमचे सूप तयार होईल. वर चिमूटभर काळी मिरी घाला. या सूपचे दररोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
 
मशरूम स्टर फ्राय -
वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मशरूम स्टर फ्रायचाही समावेश करू शकता. हे करण्यासाठी, गाजर, कांदे, कोबी, मशरूम आणि टोमॅटोचे बारीक तुकडे करा. आता कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात आले आणि लसूण परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या टाका आणि किमान 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चीजचे तुकडेही घालू शकता. यानंतर त्यामध्ये काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. 2-3 मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचे मशरूम स्टर फ्राय तयार होईल. अशा प्रकारे तुम्हाला चव मिळेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
 
मशरूम ची भाजी - 
वजन कमी करण्यासाठी मशरूमची भाजी खाणे फायदेशीर ठरू शकते. मशरूममध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याचबरोबर मशरूममध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. यासोबतच हे वजन कमी करण्यासही मदत करते. मशरूम करी बनवण्यासाठी कमीत कमी प्रमाणात तूप किंवा तेल वापरा.
 






Edited by - Priya Dixit