Pegan Diet ने लठ्ठपणा पळवा, पेगन डायटचे नियम जाणून घ्या

Last Modified बुधवार, 20 जानेवारी 2021 (13:10 IST)
हल्ली नवीन डायट प्लान ट्रेंडमध्ये आहे ज्याचे नाव आहे- पेगन डायट प्लान. हे प्लान वजन कमी करण्यात मदत करेल आणि लठ्ठपणाशी निगडित आजार नाहीसे करेल. पेगन डायट हे पॅलियो आणि व्हेगन आहारपद्धतींचे कॉम्बिनेशन आहे. या आहारात काही विशेष खाद्य पदार्थांचा समावेश केला जातो. आपण ही डायट फॉलो करु इच्छित असाल तर त्याचे नियम, फायदे आणि नुकसान जाणून घेणे आवश्यक आहे-

पेगन डायट हे पॅलियो आणि व्हेगन आहारपद्धतींवर आधारित आहे. पॅलियो डायटमध्ये जास्त भर प्रथिनांवर दिलं जातं ज्यात मांस, फळं, माज्या आणि मासोळ्या सारख्या पदार्थांचे सेवन केलं जातं. या आहारात धान्य, फळ्या, साखर, मीठ आणि चहा-कॉफी सारखे पदार्थ वर्ज्य आहे. तर व्हेगन डायट मध्ये मांसाहार आणि दुध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्राण्यांपासून मिळालेले सर्व पदार्थ वर्ज्य आहेत.
दोन्ही डायट एकमेकांच्या विपरित आहे तरी पेगन डायटमध्ये संतुलित प्रमाणात पोषक तत्त्व मिळावे यावर भर देण्यात येतं. म्हणून यात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. पेगन डायटमध्ये व्यक्तीच्या एकूण आहाराच्या 75 टक्के भाग फळं आणि भाज्या असा असावा.

काय खावे
या आहारात बटाटे, कॉर्न सारख्या स्टार्चचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ टाळावे आणि नॉन स्टार्च आहार घ्यावा. तसेच आहारामध्ये कडधान्ये, डाळी, सुकामेवा, इत्यादी पदार्थांचा समावेश करायचा आहे. मांसाहारी व्यक्ती अंडी, मासे, चिकन इत्यादी पदार्थांचा समावेश करु शकतात. पण त्याचे प्रमाण 25 टक्क्यांहून अधिक नसावे. तरी हेल्दी फॅट्स आहारात सामील करता येईल ज्यात ओमेगा-3 स्त्रोताचे समावेश आहे. तरी शक्यतो आर्गेंनिक फूड वापरण्याचा सल्ला दिला जातो.
काय टाळावे
या आहारात डेअरी प्रॉडक्ट्स जसे दूध, दही, लोणी आणि पनीर केवळ एकदा घेणे योग्य ठरेल. परंत वीटबेस प्रॉडक्ट्स टाळावे. ग्लूटने फ्री ग्रेन, ब्राऊन राईस घेता येतील तरी कमी प्रमाणात. पेगन डायटमध्ये कृत्रिम रंग, स्वाद आणि गोड पदार्थ हे विसरावं लागेल.

फायदे
यात प्रोसेस्ड किंवा तेलकट, गोड पदार्थ वर्ज्य असल्याने वजन नियंत्रण होतं. मधुमेहाची तक्रार दूर होते. रक्त पातळीवर नियंत्रण राहतं, शरीराची चयापचय शक्ती सुधारते.

तोटे
यात मांसाहार शक्यतो वर्ज्य असल्यामुळे मांसाहारी लोकांसाठी हे अवघड होऊ शकतं. तसेच भाज्यांचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करायचे असल्याने पोषक तत्तवांची कमी भासू शकते.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, ...

Relationships Tips :नशिबाने हे पाच प्रकारचे मित्र भेटतात, त्यांना गमावू नका
जगातील प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात. कुणाला कमी तर कुणाला जास्त, पण प्रत्येकाच्या ...

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्यासाठी या रेसिपी आणि ...

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पावभाजी बनवण्यासाठी या रेसिपी आणि कुकिंगच्या टिप्स फॉलो करा
हिवाळ्यात, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करणे खूप महत्वाचे ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या ...

Fengshui आपल्या जीवनात आनंद आणि प्रेमाला आर्कषित करतात या गोष्टी
वास्तूशी निगडीत चाइनीज ट्रेडिशन फेंगशुई नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेबद्दल अनेक ...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...

आयुष्य कठीण अजिबात नसतं...
आयुष्य कठीण अजिबात नसतं... कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी ...

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर

जिम जाणे योग्य की योगा करणे, जाणून घ्या अंतर
हल्ली अखाडाऐवजी जिमचा क्रेझ वाढत चालला आहे. आता प्रश्न असा आहे की जिममध्ये व्यायाम करणे ...