रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (18:30 IST)

दर रोज केळी खाल्ल्याचे फायदे जाणून घ्या

आपण बऱ्याच प्रकाराच्या फळांचे सेवन करतो जेणे करून आपल्या शरीरास त्याचा फायदा मिळू शकेल. असेच एक फळ आहे केळी, जे आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा देण्याचे काम करतो. या मध्ये प्रथिन, व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून डॉक्टर देखील दररोज केळी खाण्याचा सल्ला देतात. दररोज केळी खाल्ल्यानं  शरीराला आजाराशी लढा देण्यास मदत मिळते. हे फळ खूप स्वस्त आहे आणि कोणत्याही हंगामात सहज मिळतो. चला तर मग त्याच्या फायद्या बद्दल जाणून घेऊ या. 
 
* वजन कमी करण्यात फायदेशीर- 
लोक आपल्या वजनाला कमी करण्यासाठी बरेच काही उपाय करतात. पण त्यांना हे माहीत नाही की केळी हे वाढत्या वजनाला कमी करण्यात उपयुक्त आहे. शरीराचे वाढते वजन आणि लठ्ठपणा आपल्या तंदुरुस्त शरीरास बिघडविण्याचे काम करतो. या शिवाय लठ्ठपणा वाढल्यानं अनेक आजार होऊ शकतात. दररोज सकाळी केळी खा आणि कोमट पाणी प्या. असं केल्यानं वजन कमी करण्यात  मदत मिळते आणि आपण तंदुरुस्त राहू शकता. 
 
* हृदयाला निरोगी ठेवण्यात फायदेशीर-  
हृदय निरोगी ठेवण्यासाठी केळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. केळी मध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून दररोज फक्त एक केळी खाल्ल्यानं कोलेस्टेरॉलच्या पातळीला नियंत्रित ठेवण्यात मदत मिळते. कोलेस्ट्राल वाढल्यानं हृदय विकार होतात हे सर्वांनाच माहीत आहे. जर आपण देखील आपल्या हृदयाला निरोगी आणि तरुण ठेवू इच्छिता, तर दररोज नियमितपणे केळीचे सेवन करावे. 
 
* ऊर्जा मिळते -
बऱ्याच वेळा सकाळी शाळा,महाविद्यालय,ऑफिस किंवा इतर  कोणत्याही ठिकाणी जाण्याच्या घाई गर्दीमुळे न्याहारीत केळी खाऊ शकता. केळी मध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट असत जे लवकर पोट भरतो. तसेच केळीचे सेवन केल्याने शरीरास ऊर्जा मिळते, एवढेच नव्हे तर केळी हे शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्याचे काम देखील करतो. म्हणून अशक्तपणा असलेल्या रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. 
 
* तणाव दूर करण्यात फायदेशीर -
केळीमध्ये असलेले ट्रायप्टोफान, सेरेटेांनिन नावाचे हार्मोन्स तयार करतं, ज्यामुळे तणाव दूर होण्यात आणि मन:स्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. केळी  हे हाडांसाठी देखील फायदेशीर मानले आहे. केळी मध्ये एक विशेष प्रकाराचे प्रोबायोटिक बॅक्टेरिया आढळतं, ज्याचे काम आपल्या अन्नामधून कॅल्शियम शोषून हाडांना बळकट करण्याचे आहे. केळी मध्ये पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे रक्तपरिसंचरण योग्य ठेवण्यास देखील मदत करतं. तसेच हे मेंदूला दृढ आणि सक्रिय ठेवतं.