मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (18:57 IST)

हिवाळ्यात गरोदर स्त्रियांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

गर्भधारणेची सुरुवात हिवाळ्याच्या हंगामात होत असल्यास बायकांना काही अडचणींना सामोरी जावं लागतं. ह्याचं मुख्य कारण असं  की काही स्त्रिया प्रथमच आई होणार असतात. त्यामुळे त्यांना या संदर्भात कमीच माहिती असते दुसरं की हिवाळ्याच्या हंगामात कफ आणि संसर्गापासून त्रास होण्याची शक्यता होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ या की गरोदरपणात बायकांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. 
 
* पाणी पिणं महत्त्वाचे आहे-
गरोदर बायकांना जरी तहान नसेल तरी त्यांनी हिवाळ्याच्या हंगामात पुरेसे पाणी पीत राहावे. जेणे करून शरीर हायड्रेट राहील. तसेच पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ पीत राहावं.
 
* थंडी पासून संरक्षण करावं - 
* हिवाळ्याच्या हंगामात स्टायलिश दिसण्यासाठी जॅकेट वापरू शकता. 
* योग्य प्रकारे कापडं घाला आणि निष्काळजीपणा करू नका. 
सामान्यतः हिवाळ्याच्या हंगामात सामान्य लोकांप्रमाणे गरोदर बायका देखील त्वचा कोरडी होणं आणि त्वचेशी निगडित अनेक समस्यांमुळे अस्वस्थ राहतात.अशा परिस्थितीत त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी नेहमी व्हिटॅमिन सी ने समृद्ध पदार्थांचे सेवन करावं. या व्यतिरिक्त संत्र किंवा संत्र्याचे ज्यूस किंवा रस घेऊ शकता. या शिवाय रात्री झोपण्यापूर्वी केशरचे दूध पिऊन झोपावं. ज्यामुळे शरीरात उब येईल आणि झोप देखील चांगली येईल.