दीर्घ श्वास घेण्याचे फायदे
योग्यरीत्या श्वास घेणे समग्र आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्यरीत्या श्वास घेतल्याने शरीर निरोगी राहतं. सकाळी खुल्या हवेत बसावे आणि दहा ते पंधरा मिनिटं दीर्घ श्वास घ्यावा याने मस्तिष्क शांत राहतं आणि ताण दूर होतं. याव्यतिरिक्त याचे अनेक फायदे आहे-
नैसर्गिक वेदना निवारक
जेव्हा आपण दीर्घ श्वास घेता तेव्हा शरीरात एंडार्फिन हार्मोन्सचा स्त्राव होतो. हा हार्मोन चांगल्या अनुभवण्यासाठी मदत करंत. हे नैसर्गिक पेन किलर आहे.
रोगप्रतिकार क्षमता सुधारते
दीर्घ श्वास घेतल्याने ताजी ऑक्सिजन मिळते आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा विषारी पदार्थ आणि कार्बन डाय-ऑक्साइड शरीरातून बाहेर निघतात. जेव्हा रक्ताचे ऑक्सीकरण होतं तेव्हा हे शरीराचे महत्त्वाचे अवयव, तसेच प्रतिरक्षा प्रणालीला सुधारण्यास मदत करतं. शुद्ध रक्ताची आपूर्ती होत असल्याने संक्रमणापासून वाचता येतं अर्थातच रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते.
शरीराला डिटॉक्स करते
दीर्घ श्वास घेण्याने शरीर विषमुक्त होतं जर आपण हळू श्वास घेत असाल तर हे काम करायला शरीराला अधिक वेळ लागतो. दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते आणि श्वसन प्रणाली दुरुस्त होते.
मानसिक आराम मिळतो
क्रोध समस्या आणि भीतीमुळे स्नायू कडक होतात आणि दीर्घ श्वास घेतल्याने मेंदू आणि शरीराला आराम मिळतो.