शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (13:14 IST)

Weight loss: नियमितपणे दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे जाणून घ्या

कोरोना व्हायरसमुळे आपल्या जीवनात बरेचशे बदल घडले आहेत, तर या बदलमध्ये घरात व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची लगबग देखील सामील आहे. घरात राहून स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवावे यावर लोकांचा भर आहे. आम्ही आपणास इथे सांगू इच्छितो की आपण देखील तंदुरुस्त राहण्याचे मार्ग शोधत आहात तर आपण skipping अर्थात दोरीच्या उड्यांना व्यायाम स्वरूपात देखील सामील करू शकता.

या व्यायामासाठी आपल्याला जास्त जागेची किंवा कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नसते. हे आपण आपल्या सोयीनुसार देखील करू शकता. तसं पण बहुतेक लोकांना दोरीच्या उड्या मारण्यास आवडतं, कारण हा एक सोपा, सोयीस्कर आणि प्रभावी व्यायाम आहे, तर हा आपल्या बालपणीच्या आठवणींना ताजतवानं करतं. 
 
लहानपणी मुलं खूप मजे घेऊन दोरी उडी मारायला पसंत करतात, तर कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण दोरीला आपल्या दिनचर्यांमध्ये एका व्यायामाच्या स्वरूपामध्ये समाविष्ट करू शकता. जे आपणास सक्रिय, तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल. चला तर मग दोरीच्या उडीचे फायदे जाणून घेऊया. काय -काय फायदे आहे त्याचे?
 
दोरीच्या उड्या मारण्याचेचे फायदे :
दोरीच्या उड्या हा एक हृदयाचा व्यायाम आहे. हा आपल्या कॅलोरीला कमी करण्यात मदत करतं. 
आपण नियमितपणे दोरीच्या उड्या केल्याने वजन वाढण्यासारख्या त्रासाला टाळता येऊ शकतं.
फक्त 1 मिनिटे उड्या मारून आपल्याला 15 ते 20 कॅलोरी बर्न करण्यास मदत मिळू शकते. याचा अर्थ असा आहे की सुमारे 15 मिनिटे दोरीच्या उड्या मारून आपण 200 -300 कॅलोरी बर्न करू शकता.
 
सध्या लोकं घरातच असल्यामुळे शरीराचा व्यायाम होऊ शकत नाहीये आणि यामुळे आजारी पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशात दररोज योगा सारख्या व्यायामाचा सराव नियमाने करायला हवा. जर का आपण शारीरिकरीत्या सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दोरीच्या उड्या मारण्यास इच्छित असल्यास हे काही टिप्स आपल्यासाठी आहेत.
 
1 दोरीच्या उड्या मारण्यासाठी मोकळी जागा जसे की गच्ची, बालकनी किंवा आपल्या घराची बाग निवडा.
2 एक चांगली दोरी घ्या. लक्षात असू द्या की दोरी बळकट असायला हवी.
3 आपल्या उंचीनुसार दोरीला समायोजित करावं.