1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (07:58 IST)

आपल्या पायांवर सूज येते? मग हे कारणं असू शकतं

Swelling in legs
आजकाळ पायांवर सूज येणे ही एक मोठी समस्या बनली आहे. यामागील कारणे काय आहे? या बद्दलची माहिती बऱ्याच कमी जणांना असते. पायांवर सूज आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना होत नसते. पण दैनंदिन कामांमध्ये अडचण येऊ शकते. चला तर मग जाणून घेउया पायांवरची सूज कश्यामुळे उध्दभवते?
 
बऱ्याच काळ पाय खाली लोंबकळत ठेवल्याने पायांवर सूज येते, जसे की ऑफिसमध्ये बऱ्याच काळ पाय लोंबकळत ठेवून बसल्याने देखील पायांवर सूज येते.

जे लोकं मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत, त्याचा पायांवर सूज दिसून येते. असे यकृतामध्ये पुरेसे एलब्यूमिन तयार होत नसल्यामुळे होते. एलब्यूमिन हे एका प्रकारांचे प्रथिन असतं ज्याचे प्रमाण कमी होते.
 
ज्यांना हृदयासंबन्धी आजार आहेत किंवा ज्यांचे हृदय कमकुवत आहे, त्यांचा शरीरात रक्त योग्यरीत्या पंप करत नाही. ज्यामुळे रक्त वाहिन्यांमधून द्रव बाहेर पडून त्वचेच्या खालील ऊतींमध्ये जाऊ लागतं. ज्यामुळे पाय सुजतात.
 
रक्तामध्ये प्रथिनच्या कमतरतेमुळे देखील पायांवर सूज येण्याची समस्या उदभवते.