Health Alert! मजेसाठी खाण्यात घेतले जाणारे हे 5 पदार्थ यकृताला कमकुवत करतात
निव्वळ मजेसाठी खाण्यात घेतल्या जाणाऱ्या या 5 गोष्टी यकृताला खूप कमकुवत करतात. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे यकृत(लिव्हर) निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. परंतु चवीसाठी खाल्लेल्या बऱ्याच गोष्टी यकृताला कमकुवत करण्याचे कार्य करतात. यामुळे यकृतात संसर्ग(इन्फेक्शन) फॅटी लिव्हर, हेपेटायटिस सारख्या आजाराला सामोरी जावं लागत. या पासून वाचण्यासाठी आहारात अश्या पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहावे. चला तर मग आज आम्ही आपणांस 5 अश्या गोष्टींबद्दल सांगू या, ज्याचे सेवन करण्यापासून स्वतःला वाचवायचे..
मीठ - मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरास हानी होते. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यावर यकृतावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपल्याला यकृत निकामी होण्या सारख्या समस्येला सामोरी जावं लागू शकतं. म्हणून मिठाचा वापर कमी प्रमाणात करण्यासह याला फळ किंवा भाज्यांवर टाकून खाणं टाळावं.
साखर - मिठाप्रमाणेच जास्त साखर खाल्ल्याने यकृताशी निगडित समस्यांना सामोरी जावं लागू शकतं. जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्याने जिथे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो तर यामुळे यकृत कमकुवत होऊ शकतं. अशा परिस्थितीत शरीरास गोड पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे.
फास्ट फूड - मोठ्या प्रमाणात प्रोसेस्ड फूडचे सेवन केल्याने याचा परिणाम थेट यकृताच्या आरोग्यावर पडतो. यामुळे यकृत कमकुवत होऊ लागतं. आणि यकृत व्यवस्थिरित्या कार्य करू शकतं नाही. खरं तर हे खाद्य पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मसाले आणि तेल वापरतात जे यकृतावर वाईट परिणाम करतं. अश्या परिस्थितीत आपल्याला हवं की यकृताला बळकट आणि योग्य बनविण्यासाठी फास्ट फूड, मसालेदार या सारख्या पदार्थांपासून लांब राहणं आणि खाणं टाळणे आवश्यक आहे.
लाल मांस - बरेचशे लोकांना आहारामध्ये लाल मांस खाणे आवडतात. परंतु जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने यकृत कमकुवत होऊ शकतं. अश्या परिस्थितीत याचा सेवनाने यकृताची कार्यक्षमता कमी होते. म्हणून या त्रासापासून वाचण्यासाठी आणि यकृताला निरोगी ठेवण्यासाठी लाल मांसाचे सेवन कमी करावं.
मद्यपान - मद्यपान करणं हे आरोग्यासाठी हानीप्रद आहे. क्वचितच कोणास माहीत नसेल याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृतावर सूज येणं आणि त्याच्याशी संबंधित आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. अश्या परिस्थितीत याला निरोगी ठेवण्यासाठी शक्य तितक्या लवकर मद्यपान पासून लांब राहणे कधीही चांगलेच.