शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दातांच्या पिवळसरपणा पासून मुक्त होण्यासाठी टिप्स

दातांच्या पिवळेपणाच्या समस्येने वेढला आहात. बोलताना आत्मविश्वास कमी वाटतो. असं आहे तर या पासून सुटका मिळविण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या. 
 
* सफरचंदाचे व्हिनेगर - आपण सफरचंदाच्या व्हिनेगर बद्दल ऐकलेच असेल ह्याचे बरेच आश्चर्यकारक फायदे आहेत. हे आपल्या दाताचा पिवळसरपणा  
दूर करतो. 
 
* सफरचंदाचे व्हिनेगर आपल्या दातांची खोलपणे स्वच्छता करण्यात सक्षम असतो. 
 
* अम्लीय असल्याने पीएच समानता राखते, दात अधिक स्वच्छ आणि चकचकीत दिसतात.
 
* हे आपल्या हिरड्यांना देखील निरोगी ठेवते. 
 
* या साठी एक कप पाण्यात अर्ध चमचा सफरचंदाचे व्हिनेगर घ्या आणि टूथ ब्रश च्या साहाय्याने दातांवर चोळा जो पर्यंत दात पूर्णपणे स्वच्छ होत नाही. 
दातावरील डाग देखील याने जातात. दातांची चमक वाढते. परंतु हे वापरतांना काही काळजी घ्यावयाची आहे .जाणून घेऊ या काय काळजी घ्यावयाची आहे. 
 
* सफरचंदाचे व्हिनेगर वापरण्यापूर्वी बाटली नीट ढवळून घ्या. नंतर वापरा.
 
* पाण्यात न मिसळता हे वापरणे हानिकारक असू शकते. कारण हे नैसर्गिक आम्ल आहे.  
 
* त्याचा अत्यधिक वापर करणे टाळा, दिवसातून ऐका पेक्षा जास्त वापर करू नका. अन्यथा हे दातांना नुकसान देऊ शकते.