शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (19:36 IST)

टोमॅटो आरोग्यासाठी वरदान, बरेच रोग होतात बरे

टोमॅटो जग भरात सर्वाधिक वापरलं जाणारं फळं किंवा भाज्यापैकी एक आहे. भारतीय खाद्य पदार्थ तयार करताना टोमॅटो वापरला जातो. टोमॅटोविना चटणी, सलाद, सूप, सॉस याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. यात अनेक गुणकारी घटक देखील असतात ज्याने रोगांवर उपचार शक्य आहे.
 
जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे वरदान आहे टोमॅटो-
 
1 टोमॅटोत भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फास्फोरस आणि व्हिटॅमिन सी आढळतं. अॅसिडिटीची समस्या असल्यास टोमॅटोची खुराक वाढवल्यास यात आराम ‍मिळतो.
 
2 टोमॅटोत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' आढळतं. हे डोळ्यांसाठी फायद्याचं ठरतं.
 
3 टोमॅटो खाल्ल्याने पचन शक्ती सुधारते आणि गॅस संबंधी समस्या दूर होते.
 
4 डॉक्टरांच्या मते टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने श्वसन नळी स्वच्छ राहते आणि खोकला, पडसं याची समस्या येन नाही.
 
5 मुलांसाठी टोमॅटोचा रस फायदेशीर ठरतं. याने जलद विकास होण्यास मदत होते.
 
6 गर्भवती स्त्रियांनी दररोज सकाळी एक ग्लास टोमॅटोचं रस पिणे फायद्याचं ठरतं.
 
7 डायबिटीज आणि हृद्यासंबंधी आरोग्यासाठी टोमॅटो अत्यतं गुणकारी आहे.
 
8 टोमॅटोचं सेवन केल्याने कर्करोगाच्या आजरावर फायदा होतो, याने कफ नाहीसा होतो आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.
 
9 पोटात किडे असल्याची तक्रार असल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोमध्ये मिरपूड घालून खाल्ल्याने आराम मिळतो. आपण सूप देखील पिऊ शकता।