मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (15:40 IST)

Benefits Of Tomato Juice: टॉमेटोने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवा

टॉमेटोचा वापर अन्नाच्या चववाढी साठी करतात. पौष्टिक गुणधर्माने समृद्ध टॉमेटो आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे टमाट्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही मिळवता येत. टॉमेटो आपल्याला सुंदर त्वचेची इच्छा मिळविण्यासाठी उपयुक्त आहे. बरेच लोक टॉमेटो सॅलड किंवा कोशिंबीरच्या रूपात घेणे पसंत करतात. तसेच आपणास सांगू इच्छितो की टॉमेटोचे रस किंवा ज्यूस दररोज प्यायल्याने त्वचेचे आजार बरे होतात चेहऱ्यावर तजेलपणा आणि चकाकी येते.
 
फायदे जाणून घ्या-
* अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी टोमॅटोच्या रसात सैंधव मीठ आणि सुंठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. 
* टॉमेटोच्या रसात काळी मिरी आणि वेलचीपूड मिसळून सेवन केल्याने जीव घाबरणे, मळमळण्यापासून आराम मिळतो.
* पचन क्रिया दुरुस्त करण्यासाठी टॉमेटोच्या रसात आलं आणि लिंबाचा रस, थोडंसं सैंधव मीठ टाकून प्यायल्याने पचन सुरळीत राहतं.
* टॉमेटोच्या रसाचे दररोज सेवन केल्याने पोटाशी निगडित सर्व त्रासापासून सुटका मिळू शकते.
* टॉमेटोच्या सूप मध्ये काळी मिरी टाकून नियमितपणे प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या त्रासापासून सुटका होते. तसेच चेहऱ्यावर चकाकी आणि शरीरात स्फूर्ती बनून राहते.
* कफ किंवा खोकल्यापासून त्रस्त असाल तर टॉमेटोच्या सुपात काळी मिरपूड किंवा लाल तिखट टाकावे आणि या सुप दररोज गरम प्यायल्याने कफ, खोकला, श्लेष्मा किंवा थुंकीच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
टोमॅटोचे त्वचेसाठीचे फायदे -
* त्वचेसाठी टोमॅटो फायदेशीर असल्याचे मानले जाते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच टोमॅटो अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करतं, जे त्वचेवर रेषा आणि सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण असतं.
* टोमॅटोचे रस त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर आपल्याला मुरुमांचा त्रास होत असल्यास, टमाट्यांचे सेवन करून आणि याला चेहऱ्यावर लावल्याने आपण मुरूम आणि पुळ्या, पुटकुळ्यांपासून सुटका मिळवू शकता.
* एक चमचा टोमॅटो रसात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि अर्धा चमचा मलई मिसळून लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि तजेलता येते.
* टॉमेटोच्या रसाला प्यायल्याने रक्त स्वच्छ होतं आणि चेहरा चमकतो.
* टॉमेटो रस नियमितपणे प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येतो.