शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

निरोगी जीवन जगण्यासाठी हे करून बघा..।

१. वेगवेगळ्या कारणांनी आलेला ताण-तणाव, डिप्रेशन कमी केल्यास फायदा होतो. त्याकरिता योगासने, प्राणायाम, ध्यान करणे, सकाळी किंवा सायंकाळी फिरणे किंवा तत्सम हलका-फुलका व्यायाम करावा.
 
२. व्यसनापासून मुक्त होऊन सकारात्मक विचार व सकारात्मक जीवन जगण्याचा यशस्वी प्रयत्न केल्यास या व्याधीपासून दूर राहता येईल.
 
३. जेवणाच्या वेळा ठरवून त्या वेळी नियमित जेवण घेणे, पचायला हलका आहार घेऊन चयापचय बिघडणार नाही याची काळजी घेऊन चहा, कॉफी, शीतपेय यापासून दूर राहिल्यास ही व्याधी जडणार नाही.
 
४. नियमित व्यायाम केल्यास शरीर हलके व स्वस्थ होते; परंतु झोपण्यापूर्वी व्यायाम टाळावा. सकाळी योगासने, प्राणायाम केल्यास अधिक लाभ होतो.
 
५. झोपण्याची वेळ व पहाटे उठण्याची वेळ निश्‍चित करावी.
 
६. झोपताना शरीर ढिले करून दीर्घश्‍वसनाचा अभ्यास करावा.
 
७. सायंकाळी कोमट पाण्याने किंवा उन्हाळ्यात सामान्य पाण्याने स्नान केल्यास लाभ होतो. 
 
८. शक्यतोवर अलार्म लावू नये. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास लावला तर चालेल.
 
९. झोपताना अर्धा ग्लास गरम दूध प्यावे. स्थूल व्यक्तीने मात्र दुधाचा प्रयोग करू नये. 
 
१0. शरीरास हलका मसाज केल्यास अत्यंत लाभ होतो.
 
अशा प्रकारे आपली दिनचर्या व आहार-विहार ठेवल्यास अनिद्रेपासून दूर राहता येईल व निरोगी जीवन जगता येईल.