आलं व सुंठीतील फरक समजून घ्या!

sunth powde
Last Modified शुक्रवार, 30 जुलै 2021 (23:14 IST)
हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.
आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.

पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.
आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

सुंठीवाचून खोकला गेला ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.
आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्‍यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.
याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्‍यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- ...

Diwali Special sweet dish :  सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय ...

“वाडा”

“वाडा”
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून ...

पती -पत्नीच्या नात्यात या गोष्टींची काळजी घेतल्याने प्रेम ...

पती -पत्नीच्या नात्यात या गोष्टींची काळजी घेतल्याने प्रेम वाढते, लक्ष्मीची कृपाही कायम राहते
पती -पत्नीच्या नातेसंबंधात संवाद नसणे आणि अहंकार अशी भावना कधीही नसावी. या गोष्टी लक्षात ...

अर्ध मत्स्येन्द्रासन : फायदे आणि आसन करण्याची योग्य पद्धत ...

अर्ध मत्स्येन्द्रासन : फायदे आणि आसन करण्याची योग्य पद्धत Ardhamatsyendrasana
अर्धमात्स्येंद्रासनाला "हाफ स्पाइनल ट्विस्ट पोझ" असेही म्हणतात. तसे, "अर्ध मत्स्येंद्रसन" ...

IBPS Clerk Recruitment 2021 बँक लिपिक भरतीमध्ये रिक्त ...

IBPS Clerk Recruitment 2021 बँक लिपिक भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक भरती 2021 मध्ये पदांची संख्या ...