रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Vegetables for Diabetes रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात 4 भाज्यांचा समावेश करा

vegetables
Vegetables for Diabetes मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारातील घटकांचे सेवन करण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, जेणेकरून त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहू शकेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. यासाठी रोजच्या आहारात सकस भाज्यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रणही कमी होण्यास मदत होते. आहारात सकस भाज्यांचा समावेश केल्यास इन्सुलिनची पातळी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तर चला जाणून घेऊया अशा काही आरोग्यदायी भाज्यांबद्दल ज्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत करतात.
 
कारले
कारल्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. पॉलिपेप्टाइड-पी किंवा पी-इन्सुलिन देखील कारल्यामध्ये आढळते, जे नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रित करते. कारले सर्वात निरोगी आणि फायबर समृद्ध भाज्यांपैकी एक आहे. कारल्यामध्ये अशी संयुगे असतात जी ग्लुकोजची पातळी सुधारू शकतात आणि इन्सुलिन वाढवू शकतात. कारल्याचे रोज सेवन केल्याने मधुमेह कमी होण्यास मदत होते.
 
भेंडी
डायबिटीजचे रुग्ण भेंडीची भाजी खाऊ शकतात. भेंडीचे सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते तरी ही भाजी बनवताना अधिक तेल आणि मसाले वापरु नये. यात फायबर आढळतात आणि यात पचनसंस्थेमध्ये मधुमेह नियंत्रित करणारी संयुगे आहेत. हे साखरेचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करते.
 
ब्रोकली
ब्रोकोली कमी कॅलरीज, उच्च फायबर असणारी क्रूसिफेरस भाजी आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध ब्रोकली इंसुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. याशिवाय ब्रोकोलीमध्ये जळजळ कमी करण्याचे गुणधर्म आहेत, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
 
पालक
पालकामध्ये लोह, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे इन्सुलिन सुधारण्यास मदत करते. हे फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होते. यासोबतच फायबर रक्तप्रवाहातील साखरेचे शोषण कमी करते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए सारख्या पोषक घटक असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांनी सेवन केले पाहिजे.