गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (16:18 IST)

Vicaros veins या '5' सवयी वाढवतात व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास

Vicaros veins
फार काळ बसणं
एकाच ठिकाणी उभं राहणं त्रासदायक आहे त्याचप्रमाणे एकाच जागेवर बसून राहणंदेखील आरोग्याला नुकसानकारकच ठरते. डेस्क जॉब असणार्‍यांना हा त्रास अधिक जाणवतो. फार काळ बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रासही वाढतो. त्यामुळे ठराविक वेळाने उठून थोड्यावेळ  फिरा.
 
फार काळ उभं राहणं
काही लोकांना नोकरी करताना त्याचा एक भाग म्हणून सतत उभं राहव लागतं. एकाच जागी फार काळ उभं राहिल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढतो. एकाच जागी उभं राहण्यापेक्षा थोडं चाला, फिरा. अन्यथा पायांवर ताण येतो. रक्त साखळण्याचा धोका वाढतो. हळूहळू रक्तवाहिन्यांमधील व्हॉल्वला देखील  नुकसान होते.
 
हाय हिल्स
जास्त प्रमाणात हिल्स घालणं मुलींना फार आवडतं पण त्यामुळे आरोग्यावर नकळत काही परिणाम होऊ शकतो. हिल्स घालून चालल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा येतो. परिणामी व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास बळावतो.  
 
मिठाचा वापर जास्त   
वेफर्स, लोणचं, पापड यामध्ये मीठ अधिक असते पण त्याचा आहारात अधिक प्रमाणात समावेश केल्यास व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. मिठामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो.
 
पाय क्रॉस करून बसणं  
पायांवर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे पायांवर आणि हिप्सवरही ताण येतो. यामुळे रक्तवाहिन्या फुगतात. हळूहळू जाळं वाढतं.