गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (19:12 IST)

शांत झोपेसाठी...For Peaceful Sleep

sleep
For Peaceful Sleep आजच्या धकाधकीच्या जीवनात शांत, निवांत झोप मिळणं दुरापस्त झालंय. डेडलाइन्स पूर्ण करताना झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. यामुळे ताण वाढतोय. प्रत्येकाने शांत झोप घेणं गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते महत्वाचं ठरतं. मोनस्वास्थ्य जपण्याच्या या काही टिप्स...
 
गॅझेट्स लांब करा
झोपायाची तयारी सुरू असताना गॅझेट्स दूर ठेवा. सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअॅपमुळे आपण लोकांच्या सतत संपर्कात असतो. आपल्या झोपेवर गॅझेट्सचा विपरित परिणाम होऊ लागलाय. झोपेच्या वेळेत काम आणू नका. झोपण्याच्या तासभर आधी गॅझेट्सपासून दूर राहा.
 
झोपेची वेळ
झोपेची पद्धत ठरवा. ठरलेल्या वेळी पलंगावर जा. वेळेत झोपा. सकाळी लवकर उठा. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. सात ते आठ तार झोप घ्या.
 
योग्य वातावरण
खोलीतलं वातावरण झोपेसाठी योग्य असू द्या. झोपण्याआधी दिवे बंद करा. आजूबाजूला खोलीत शांतता असू द्या.
 
मनपसंत रंग
पलंगावर आपल्या आवडीच्या रंगाची चादर अंथरा. तसेतर हलक्या रंगाची चादर सर्वात योग्य असते तरी आपण आपल्या आवडीप्रमाणे रंग आणि प्रिंट निवडून चादर अंथरून झोपा.
 
मन शांत
झोपण्यापूर्वी भीतिदायक चित्रपट किंवा दृश्य बघू नका. यामुळे झोपेत अडथळे येऊ शकतात.
 
शारीरिक थकवा आवश्यक
सतत कार्यरत राहा. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे तुम्हाला शांत झोप लागते. झोपण्याच्या तीन ते चार तास आधी व्यायाम करता येईल. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यानेही शांत झोप येते.