सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified गुरूवार, 3 जून 2021 (09:30 IST)

सायकल चालवताना या चुका करु नका, अन्यथा नुकसान होईल

सायकल चालवणे आवडत असेल आणिफिटनेससाठी आपल्या रुटीनमध्ये सायकलिंग सामील करत आहात तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी सायकल चालवणे सर्वात योग्य मानले गेले आहे. जर नियमाने सायकल चालवली तर याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. याने आपण टोन्ड  आणि पर्फेट फिगर मिळवू शकता. परंतूा सायकल चालवताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे- 
 
1. काही लोकांना वारंवार पाणी पिण्याची सवय असते, ही सवय चांगली असली तरी सायकल चालवताना अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये. कारण सायकल चालवताना जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मळमळणं ही समस्या  उद्भवू शकते. तसंच वारंवार पाणी पिण्याने वारंवार लघवी येईल. ज्यामुळे पोटदुखीला सामोरा जावं लागू शकतं. म्हणून सायकल चालवताना अधिक पाणी पिणे टाळावे.
 
2. फिट राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सायकलिंग. म्हणूनच, सायकल चालवताना फास्ट फूड किंवा जंक फूडपासून अंतर ठेवणे चांगले, कारण अनहेल्दी खाण्याने शरीरात चरबी वाढते. यामुळे आपल्याला आळशीपणा जाणवू शकतो.
 
3. सायकल चालविण्यापूर्वी स्ट्रेचिंग करु नये. तसं तर वर्कआउटपूर्वी स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सायकल चालवण्यापूर्वी स्ट्रेचिंगपासून वाचावं. याने स्नायू कमकुवत होतात आणि त्यात ताण जाणवू शकतो. जर आपल्याला स्ट्रेचिंग करायची असेल तर कमीतकमी अर्धा तास आधी करा.
 
4. बर्‍याच वेळा असे घडते की आम्ही सायकल राइडला मजेदार बनविण्यासाठी स्टंट्स करण्यास सुरवात करतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.