गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

काळे तांदुळाचे 6 फायदे

काळ्या तांदळाबद्दल कधी ऐकले आहे का? ऐकून आश्चर्य वाटेल की तांदळाची ही प्रजाती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाहू याचे 6 फायदे:
1 लठ्ठपणा: जे लोकं लठ्ठपणा करण्यासाठी भात खाणे टाळतात त्या लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

2 हृदय: आपले हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यात आढळणारे फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

3 पचन: यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. याने पोट फुलणे आणि पचनसंबंधित तक्रारही दूर होते. दररोज याचे सेवन केलं जाऊ शकतं.

4 रोग: काळे तांदुळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत आढळतं जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोग टाळण्यात मदत करतं. याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
 
5 अँटीऑक्सीडेंट: या तांदळांचा गडद रंग यात आढळणारे विशेष अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे आहे जे आपल्या त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि मेंदूसाठीही.
 
6 शरीर साफ करणारे:  अभ्यासात सिद्ध झाले आहे की काळे तांदुळाचे सेवन शरीरातून हानिकारक आणि नको असलेले तत्त्वांना बाहेर फेकून आंतरिक सफाईमध्ये मदत करतं. हे लिव्हरला स्वच्छ करण्यातही मदत करतं.